आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest News And Updates: Kisan Andolan Delhi Burari LIVE Update | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News Today 4 January

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्र-शेतकरी बैठकीत तोडगा नाहीच:जोपर्यंत कायदे परत घेणार नाहीत, तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाहीत; शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैठकीत शेतकऱ्यांनी आपले जेवण सोबत आणले होते. - Divya Marathi
बैठकीत शेतकऱ्यांनी आपले जेवण सोबत आणले होते.
  • टाळी दोन्ही हाताने वाजते- नरेंद्र सिंह तोमर

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील 8 व्या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही. विज्ञान भवनात 4 तास झालेल्या बैठकीनंतर शेतकरी म्हणाले की, आम्ही केंद्रासमोर कायदे परत घेण्याचा मुद्दा मांडला आहे. बैठकीनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, जोपर्यंत कायदे परत घेणार नाहीत, तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाहीत. दरम्यान, बैठकीत शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सोमवारी बैठकीत MSP ला कायद्यात घेण्यावरून शेतकरी आणि केंद्रात एकमत होऊ शकले नाही. परंतू, सरकार आणि शेतकरी 8 जानेवारीला परत बैठक घेण्यासाठी तयार झाले आहेत. बैठकीनंतर राकेश टिकैत म्हणाले की, '8 जानेवारीच्या बैठकीतदेखील आमचा मुद्दा MSP आणि कायद्याला परत घेणे, हाच असेल.

दरम्यान, मीटिंगनंतर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, 'आम्ही मार्ग काढावा असे, शेतकऱ्यांचे म्हणने आहे. अशा मुद्द्यांवर अनेक चर्चा चालतात. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा लागतो. देशाला डोळ्यासमोर ठेवून सरकार निर्णय घेईल. कायदे आणि MSP मुख्य मुद्दे आहेत. अशा चर्चा कधी पुढे तर कधी मागे जातात. आज झालेली चर्चा सकारात्कम वातावरणात झाली. येत्या 8 जानेवारीला परत एक बैठक बोलवली आहे.

शेतकऱ्यांचा सरकारी जेवण करण्यास नकार

सोमवारच्या बैठकीदरम्यान सरकारने शेतकऱ्यांसाठी जेवण्याची व्यवस्था केली होती. पण, शेतकऱ्यांचे सरकारी जेवण करण्यास नकार दिला आणि स्वतःचे जेवण सोबत आणले. मागच्या बैठकीतही शेतकऱ्यांनी आपले जेवण सोबत आणले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत जेवण केले होते.

बातम्या आणखी आहेत...