आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest News And Updates: Kisan Andolan Delhi Burari LIVE Update | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News Today 7 January

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनाचा 43वा दिवस:शेतकऱ्यांचा दिल्लीत ट्रॅक्टर मार्च, महिलादेखील सामील; उद्या केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची 9वी बैठक

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 26 जानेवारीला शेतकरी परेडची तयारी

नवीन कृषी कायद्याविरोधात देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा गुरुवारी 43वा दिवस आहे. आज शेतकऱ्यांनी दिल्लीच्या चहु बाजूने ट्रॅक्टर मार्च काढा. या मार्चमध्ये 60 हजार ट्रॅक्टर सामील झाल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्याया मार्चमध्ये महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हा मार्च सिंघू बॉर्डरवरुन टिकरी, टिकरीवरुन शाहजहांपूर, गाजीपूरवरुन पलवल आणि पलवलवरुन गाजीपूरपर्यंत होता.

26 जानेवारीला शेतकरी परेडची तयारी

शेतकऱ्यांनी सांगितले की, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या 26 जानेवारीलादेखील ट्रॅक्टर परेड होईल. आजचा मार्च त्या परेडचा ट्रेलर आहे. हरियाणाच्या शेतकरी संघटनांनी हरियाणातील प्रत्येक गावातून 10 महिलांना येत्या 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडसाठी दिल्लीला बोलवले आहे. हीच अपील उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी केली आहे. 26 जानेवारीला होणाऱ्या परेडचे नेतृत्व महिला करतील. यासाठी हरियाणातील 250 महिला ट्रॅक्टर चालवण्याची ट्रेनिंग घेत आहेत.

शेतकऱ्यांची उद्या सरकारशी चर्चा

शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये 4 जानेवारीला झालेल्या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. आता पुढील बैठक 8 जानेवारीला ठरली आहे. पुठील चर्चात एमएसपी आणि कृषी कायदे परत घेण्यावर चर्चा होईल. यापूर्वी झालेल्या 7 बैठकीत दोन मागण्या मान्य केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...