आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest News And Updates, Today 29 January: Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News Today 29 January

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंघु बॉर्डरवरुन:बॉर्डर रिकामे करण्यासाठी आलेल्या लोकांसोबत शेतकऱ्यांची तुफान हाणामारी; हरियाणातील 17 जिल्ह्यात इंटरनेट बंद

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तलवार लागल्याने एका पोलिस अधिकाऱ्यासह पाच पोलिस कर्मचारी जखमी

26 जानेवारीला झालेल्या हिंसक आंदोलनानंतर दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली होती. यानंतर आंदोलन निवळेल, अशी शक्यता असतानाच आता आज सिंघु बॉर्डरवर मोठा गोंधळ झाला आहे.

आज(दि. 29) दुपारी 1 वाजेच्या सुमारास नरेलाकडून आंदोलनस्थळी आलेल्या काही लोकांनी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना बॉर्डर रिकामे करण्यास सांगितले. यानंतर शेतकरी आणि त्या लोकांमध्ये हाणामारी झाली आणि प्रचंड दगडफेक सुरू झाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण काही परिणाम होताना दिसला नाही. यानंतर पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रु धुराचा मारा करावा लागला. यादरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याला तलवार लागली, तर पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे.

हरियाणातील 17 जिल्ह्यात इंटरनेट बंद

या सर्व गोंधळानंतर हरियाणा सरकारने राज्यातील 17 जिल्ह्यात इंटरनेट सर्विसेज बंदी घातली आहे. यात अंबाला, यमुनानगर, कुरुक्षेत्र, करनाल, कैथल, पानीपत, हिसार, जींद, रोहतक, भिवानी, चरखी दादरी, फतेहाबाद, रेवाडी आणि सिरसा सामील आहेत. या जिल्ह्यात वॉईस कॉल व्यकिरीक्त 30 जानेवारीच्या संध्याकाळी 5 पर्यंत इंटरनेट सेवा बंद राहतील.

यापूर्वी शेतकरी मजुर संघर्ष समितीचे नेते सतनाम सिंह पन्नू यांनी केंद्र सरकारवर आरोप लावला की, 'केंद्र सरकारने RSS च्या लोकांना पाठवून आंदोलन स्थळावरील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. काल त्यांनी दोनदा असे केले. पण, कायदे परत घेतल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाहीत.'

सिंघु बॉर्डर चारही बाजुने सील

दरम्यान, या सर्व गोंधळानंतर सिंघु बॉर्डरवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आंदोलन स्थळाला चारही बाजुने पक्के बॅरिकेड्स लावून ब्लॉक करण्यात आले आहे. तर, तिकडे टिकरी बॉर्डरवरही मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

गाजीपुर बॉर्डरवर हालचाली वाढल्या

ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसेनंतर पोलिस मागील दोन दिवसांपासून अॅक्शन मोडमध्ये आहे. यावरुन गुरुवारी शेतकरी आंदोलन संपेल, अशी शंका सर्वांना होती. पण, रात्री भारतीय शेतकरी यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर आंदोलनाने अजून वेग पकडला. आता या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा केलेल्या राष्ट्रीय लोक दल (RLD)चे नेते जयंत चौधरी टिकैत यांना भेटण्यासाठी शुक्रवारी गाजीपुर बॉर्डरला पोहोचले. यावेळी ते म्हणाले की, 'प्रशासनावर शेतकऱ्यांना हटवण्याचा दबाव आहे, पण शेतकरी येथून जाणार नाही. शेतकऱ्यांचा मुद्दा संसदेत उचलला जायला हवा.'

UP आणि हरियाणातून शेतकरी येत आहेत

गाजीपुर बॉर्डरवर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता मोठा फौज फाटा तैनात केल्यानंतर शेतकरी घरी जातील, असे सर्वांना वाटले होते. पण, आता आंदोलन अजून तीव्र झाले आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील हजारो शेतकरी गाजीपुरकडे येत आहेत.

भाजप आमदाराच्या धमकीने आंदोलन चिघळले

गाजीपुर बॉर्डरवर राकेश टिकैत गुरुवारी सायंकाळी 6 वाजता अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आंदोलनातून माघार घेण्यास तयार झाले होते. पण, काही वेळानंतर भाजप आमदार नंदकिशोर यांची एन्ट्री झाली आणि प्रकरण चिघळले. नंदकिशोर आपल्या कार्यकर्त्यांसोबत आले आणि पोलिसांना म्हणाले, आंदोलन संपवा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने संपवू. यानंतर राकेश टिकैत भडकले आणि त्यांनी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे म्हटले. यानंतर त्यांचे भाऊ नरेश टीकैतदेखील म्हणाले, आता तीन्ही काळे कायदे माघे घेतल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाहीत.