आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:राजधानी दिल्लीच्या चारही बाजूंनी...किसानपथ! केंद्र सरकारसोबत होणाऱ्या बैठकीआधी शेतकऱ्यांचे शक्तिप्रदर्शन

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी नेत्याची टिप्पणी- ही 26 जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनाची रंगीत तालीम

कृषी कायद्यांविरोधात ४३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर जमलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी दिल्लीच्या चारही बाजूंनी पेरिफेरल एक्स्प्रेस-वेवर ट्रॅक्टर मार्च काढला. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले,‘आम्ही प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर परेड करू. आज त्याचा सराव केला. त्यात २५ हजारपेक्षा जास्त ट्रॅक्टर होते. २६ जानेवारीला ६० हजार ट्रॅक्टर असतील. शुक्रवारी शेतकरी आणि सरकारमध्ये नवव्या टप्प्याची बैठक होत आहे.

मरकजसारखी स्थिती होऊ नये : सुप्रीम कोर्ट
दिल्लीच्या सीमांवरील गर्दीबाबत सुप्रीम कोर्टाने गुुरुवारी चिंता व्यक्त केली. कोर्टाने तिला दिल्लीमधील निजामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या तबलिगी जमातच्या गर्दीशी जोडत केंद्राला,‘तुम्ही मरकज प्रकरणातून काय धडा घेतला?’ असा प्रश्न विचारला. ‘शेतकरी आंदोलनामुळेही तशीच स्थिती निर्माण होऊ नये अशी भीती वाटत आहे,’ अशी टिप्पणीही केली.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना म्हटले की,‘ काय सुरू आहे हे तुम्हाला सांगावे लागेल. शेतकरी कोरोनापासून सुरक्षित आहेत की नाही हे आम्हाला माहीत नाही. संसर्ग पसरू नये, असे आम्हाला वाटते. निर्देशांचे पालन होईल हे तुम्ही पाहा.’ त्यावर मेहता म्हणाले, ‘मी माहिती घेईन.’ आंदोलनादरम्यान कोरोनापासून सुरक्षेसाठी केलेल्या उपायांवर अहवाल द्यावा, असे निर्देश कोर्टाने दिले.

कोर्टात अॅड. सुप्रिया पंडित यांनी अर्ज दिला आहे. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने शेतकरी आंदोलनावर टिप्पणी केली. सुप्रिया यांनी मरकज प्रकरणात पोलिस, दिल्ली सरकार व केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...