आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest | Pm Modi | Reacting To Modi's Announcement To Repeal The Agriculture Act, Rakesh Tikait Said,

राकेश टीकैत यांची प्रतिक्रिया:मोदींच्या कृषी कायदे रद्द करण्याचा घोषणेनंतर राकेश टीकैत यांची प्रतिक्रिया म्हणाले, "अगोदर संसदेत कृषी कायदे रद्द करा त्यानंतरच शेतकरी आंदोलन थांबेल"

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीनही कृषी कायद्यांना रद्द करण्याचा निर्णय अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होते. आज सकाळी नऊ वाजता देशाला संबोधित करत कृषी कायदे मागे घेत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही हे कायदे संपुष्टात आणणार होते. मात्र शेतकऱ्यांना आम्हाला समजावता आले नाही. अशी खंत मोदींनी व्यक्त केली.

मोदींच्या या घोषणेनंतर दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळत आहे. सोबतच अनेक जण मोदींचे आभार आणि टीका देखील करताना पाहायला मिळत आहे. शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "अगोदर संसदेमध्ये कृषी कायदे रद्द करा त्यानंतरच आम्ही आंदोलन थांबवू" असे टीकैत म्हणाले.

वर्षभरापासून आंदोलन सुरू
केंद्र सरकारने संसंदेत तीन कृषी कायदे लागू केल्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने कृषी कायद्यांना मागे घेतले जाणार नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र शेतकरी देखील आपल्या मागण्यांवर ठाम असून, त्यांनी देखील जोपर्यंत केंद्र सरकार हे आंदोलन मागे घेत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे सांगितले होते.

अनेक बैठकीनंतरही तोडगा नाही
केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावे अशी विनंती शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला केली होती. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक बैठकी झाल्या मात्र त्यात कोणताही तोडगा निघालेला नव्हता.

अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू
केंद्र सरकारने लागू केलेल्या या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर पंजाब, हरियाणासह अनेक राज्यातील शेतकरी त्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यात आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आज मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेनंतर मोदींनी त्या मृत शेतकऱ्यांचा कुटुंबीयांची माफी मागावी अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाने दिली आहे.

अन्यायाविरुद्ध विजय- राहुल गांधी
पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी एक ट्विट करत व्हिडीओ शेअर केला आहे. 'देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मस्तक झुकवले. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन!' असे राहुल गांधी म्हणाले.

मोदींनी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची माफी मागावी
शेतकरी आंदोलनाचा हा मोठा विजय असल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. आगामी निवडणुकीत पराभवाच्या भीतीने मोदी सरकारने 3 काळे कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान मोदींनी न्यायाच्या लढाईत प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. असे ट्विट आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या त्यागाचे फळ मिळाले - नवज्योत सिद्धू
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू म्हणाले की, कृषी कायदे मागे घेणे हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. अशी प्रतिक्रिया सिद्धू यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...