आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest : Police Beat Up Farmers In Patna; Discussions Between The Government And Farmers Will Take Place Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलन:पाटण्यात राजभवनाकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार; आज होणार सरकार आणि शेतकऱ्यांत चर्चा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संयुक्त किसान माेर्चाने सरकारसोबत चर्चा करण्याचे मान्य केले, मात्र कठोर भूमिका कायम

कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला ३५ दिवस झाले आहेत. बुधवारी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान, आंदोलनकर्ते शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये पाटण्यात राजभवनाकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात महिलांसह अनेक जखमी झाले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि डाव्या पक्षांच्या गांधी मैदान ते राजभवनपर्यंत काढण्यात आलेल्या किसान मार्चला रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, शेकडोंच्या संख्येत असलेल्या आंदोलकांनी पोलिसांचे ऐकले नाही. यानंतर पोलिस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला. पोलिसांच्या लाठीमारामुळे चेंगराचेंगरी झाली.

चर्चेआधी शेतकऱ्यांची कठोर भूमिका :

संयुक्त किसान माेर्चाने सरकारसोबत चर्चा करण्याचे मान्य केले आहे. मात्र, कठोर भूमिका कायम आहे. सहाव्या टप्प्यातील चर्चा चार मुद्द्यांवर केंद्रित असेल, असे माेर्चाने सरकारला पत्र पाठवून म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...