आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हरियाणाच्या करनाल जिल्ह्यात रत्तक नावाचे एक गाव आहे. सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या या गावात शीख समुदायाचे लोक राहतात. या लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे. त्यामुळे या गावातील अनेक लोक शेतकरी आंदोलनात सहभागी होत आहेत. पंजाब आणि हरियाणामधील इतर अनेक गावांप्रमाणेच रत्तक गावचे लोकही सध्या दिल्लीच्या सिंधू सीमेवर पोहोचत आहेत. जे तेथे जाऊ शकत नाहीत ते वेगवेगळ्या मार्गांनी या आंदोलनासाठी मदत करत आहेत. हे संपूर्ण गाव ज्या प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहे, ते पाहून सिंधू सीमेवर सुरू असलेल्या लंगरला सातत्याने रेशन कुठून येते? या प्रश्नाचे उत्तर देखील मिळते.
बिसलेरीच्या बाटल्यांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन सिंधू बॉर्डरवर आलेल्या रत्तक गावातील ग्रामस्थ शरणजीत सिंग सांगतात की, "या ट्रॉलीमध्ये 70 हजार रुपयांचे पाणी आणि 20 हजार रुपयांचे इतर सामान आहे. दुसरी एक ट्रॉली देखील आजच आमच्या गावातून आली आहे. त्यामध्ये सुमारे 60-70 हजार रुपयांचे रेशन आहे. आम्ही दुसऱ्यांदा गावातून रेशन घेऊन आलो आहोत. याआधी 29 नोव्हेंबर रोजी आम्ही सामान आणले होते आणि येथील वेगवेगळ्या लंगरमध्ये ते दिले होते."
रत्तक गावातील लोक सुरुवातीपासूनच या आंदोलनात सहभागी आहेत. 26 नोव्हेंबरला हजारो शेतकरी पंजाबहून दिल्लीला येत होते, तेव्हा हरियाणाच्या शेतकर्यांनी त्यांना बॅरिकेड्स तोडण्यास मदत केली होती. यात रत्तक गावातील लोकही सहभागी होते. ग्रामस्थ अमृत सिंग सांगतात की, "आम्ही पहिल्या दिवसापासूनच या आंदोलनात सहभागी आहोत. पंजाबहून आलेल्या बंधूंसोबत बॅरिकेड्स तोडण्यात आम्ही आघाडीवर होतो. हे बंधू आमच्या हरियाणात आले आहेत, तसेच ते आमचे पाहुणेही आहेत. आंदोलनात सहभागी होण्याबरोबरच या बांधवांची सेवा करणे आमचे कर्तव्य आहे, आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत."
पहिल्याच दिवशी जेव्हा रत्तक गावातील हे लोक या आंदोलनात सामील झाले तेव्हा त्यांना स्वत: ला देखील माहिती नव्हते की आंदोलन इतके दीर्घ चालणार आहे. ते सांगतात की, आम्हाला फक्त दिल्लीला जायचे होते आणि सरकार आमच्या मागण्या मान्य करेल अशी आम्हाला आशा होती. पण, जेव्हा आम्ही पाहिले की सरकारने चर्चेसाठी 3 डिसेंबरचा दिवस निश्चित केला आहे, तेव्हा असे वाटले की आता येथे तळ ठोकावा लागेल. यासाठी रेशन-पाण्यापासून प्रत्येक गोष्टींची आवश्यकता भासेल, तेव्हा आम्ही ही व्यवस्था करण्यास सुरूवात केली.
रत्तक गावातील पंजाब सिंग यांनी याची जबाबदारी उचलली. ते तत्काळ सिंधू बॉर्डरवरून परत आपल्या गावी पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांसोबत मिळून निधी जमा करण्यास सुरूवात केली. ते सांगतात की, "हजारो शेतकरी बांधव जेव्हा रस्त्यावर थांबण्यासाठी भाग पाडले, तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे आमची जबाबदारी होती. म्हणून आमच्याकडून जमेल तितकी ही व्यवस्था करण्याचे आम्ही ठरवले."
पंजाब सिंग यांच्या पुढाकाराची सुरुवात गावाच्या भागीदारीपासून सुरू झाली. लोकांनी आपआपल्या क्षमतेनुसार दान देण्यात सुरुवात केली. कोणी गव्हाचे पीठ, कोणी तांदूळ तर कोणी रोख रकमेची मदत केली. पाहता पाहता एका छोट्याशा गावातून दोन ट्रॅक्टर ट्रॉली राशन जमा झाले. हे सामना सिंधू बॉर्डरपर्यंत नेण्यासाठी गावातील गुरजिंदर सिंग आणि शरणजीत सिंग यांनी आपल्या नवीन ट्रॅक्टर ट्रॉली दिल्या.
पंजाब सिंग सांगताता की, "29 नोव्हेंबर रोजी आमच्या गावातून सुमारे दीड लाखाचे रेशन येथे पोहोचले होते. आज पुन्हा जवळपास इतकेच रेशन आम्ही पुन्हा घेऊन आलो आहोत. ही लढाई आम्हा सर्वांची आहे. यामुळे आम्ही सर्व यामध्ये आपआपली भूमिका बजावत आहोत." रेशन व्यतिरिक्त गावातील तरुण सिंधू बॉर्डरवर सेवा करत श्रमदान करत आहेत. दर चार-पाच दिवसांनी येथून काही लोक गावात परततात आणि जवळजवळ तितकेच लोक या आंदोलनात सामील होण्यासाठी गावातून परत येतात.
रत्तक गावची ही कहाणी फक्त एक उदाहरण आहे. असे शेकडो गाव हरियाणा आणि पंजाबमध्ये आहेत. जे अशाप्रकारे आंदोलनाला आपला पाठिंबा देत आहेत आणि आंदोलकांना कशाचीही कमतरता भासू नये याची खात्री करून घेत आहेत. या छोट्या खेड्यांबरोबरच आता खालसा अॅड सारख्या मोठ मोठ्या संस्था देखील सिंधू सीमेवर लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवित आहेत. यासह, गुरुद्वारा प्रबंधक समिती, स्वयंसेवी संस्था आणि वेगवेगळ्या भागातील अनेक अनिवासी भारतीय (एनआरआय) आंदोलकांना या कामात मदत करीत आहेत.
याच कारणामुळे सिंधू बॉर्डरवर केवळ भोजनच नाही तर अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत आणि रेशनची कमतरता भासत नाहीये. रत्तक गावातील पंजाब सिंग म्हणतात, "जे लोक या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी रेशन कुठून येत आहे याची विचारणा करत आहेत. त्यांनी माझ्यासोबत माझ्या गावी यावे. तेथे त्यांना पहायला मिळेल की ज्या कुटुंबाने आपल्यासाठी दोन पोते धान्य राखून ठेवले होते, त्यांनीही या आंदोलनासाठी एक पोते दान केले. प्रत्येक घराचा सहभाग असल्यामुळे हे आंदोलन मजबूत आहे."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.