आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest ; Twitter Suspends Over 500 Accounts In India After Government Warning

सरकारच्या नोटीसवर ट्विटरची कारवाई:शेतकरी आंदोलनादरम्यान 500 अकांउट्सवर कायमची बंदी, आक्षेपार्ह कंटेंट असणाऱ्या हॅशटॅगची व्हिजिबिलिटी घटवली

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्रकार, राजकारणांच्या अकांउट्सवर कोणतीही कारवाई नाही

शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारने सोशल मीडियाबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर ट्विटरने 500 अकांउट कायमची बंद केली आहेत. सरकारने ट्विटरला अनेक वादग्रस्त अकांउट आणि हॅशटॅग हटवण्याची नोटीस दिली होती. त्याच्या प्रत्युत्तरात ट्विटरने ही कारवाई केली आहे. सोशल मीडिया कंपनीने बुधवारी ही माहिती दिली. जे अकांउट्स निलंबित करण्यात आले आहेत ते कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन करीत होते, असे कंपनीने सांगितले.

ट्विटरने सांगितले की, मागील आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता आपत्तीजनक सामग्री असलेल्या हॅशटॅगची दृश्यमानता देखील कमी केली गेली आहे. भारतात आमचे नियम लागू करण्यासाठी जी पावले उचलली जात आहेत, याविषयी नियमितपणे अपडेट दिले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

पत्रकार, राजकारणांच्या अकांउट्सवर कोणतीही कारवाई नाही

ट्विटरने असेही म्हटले आहे की अशी काही खाती आहेत जी भारतात ब्लॉक केली आहेत, परंतु ती अन्य देशांमध्ये कार्यान्वीत राहतील. सोबतच वृत्तसंस्था, पत्रकार, अॅक्टिव्हिस्ट आणि राजकारणी यांच्याशी संबंधित कोणत्याही अकांउटवर कारवाई केली नसल्याचे कंपनीने सांगितले.

सरकारने भडकाऊ कंटेंटचे अकांउट्स हटवण्यास सांगितले होते

वृत्तसंस्थेच्या सूत्रांनुसार, सरकारने 2 दिवसांपूर्वी ट्विटरला 1,178 पाकिस्तानी-खालिस्तानी अकांउट्स हटवण्यास सांगितले होते. या अकांउट्सच्या माध्यमातून आंदोलनाशी संबंधित चुकीची माहिती आणि भडकाऊ कंटेंट पसरवला जात असल्याचे सरकारचे म्हणणे होते.

बातम्या आणखी आहेत...