आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest Updates: Protesters Besiege Governor's Residence In Chandigarh; News And Live Updates

कृषी कायद्याला विरोध:अन्नदाता पुन्हा दिल्लीच्या दारी; चंदीगडमध्ये राज्यपालांच्या निवासस्थानास आंदोलकांचा घेराव; सात महिन्यांपासून आंदोलन

नवी दिल्ली- लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील शेतकरी मोठ्या संख्येने दाखल
  • शेतकरी आंदोलनाचे सात महिने पूर्ण टिकरी-गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचा मोर्चा

केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण होतील. पाेलिसांनी शेतकरी मोर्चा लक्षात घेऊन दिल्ली सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था केली. शनिवारी तीन मेट्रो रेल्वे स्थानकांना बंद करण्यात आले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर आंदोलनासाठी मोठ्या संख्येने जमू लागले आहेत. त्यांचे नेतृत्व भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) वरिष्ठ नेते राकेश टिकैत करत आहेत. ते गाझीपूर गेटपर्यंत पोहोचले.

दिल्लीच्या दोन सीमा टिकरी व गाझीपूरमध्ये शेतकरी डेरेदाखल झाले आहेत. बीकेयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत म्हणाले, आम्ही आमच्या मागणीवर कायम आहोत. केंद्र तीन नवे कृषी कायदे रद्द करत आहे. आंदोलनात सुमारे ४० शेतकरी संघटनांचा समावेश आहे. देशात आणीबाणीला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण भारतात आता एकच घोषणा दिली जात आहे. शेती वाचवा, लोकशाही वाचवा, असे संघटनेचे म्हणणे आहे. दिल्लीत शेतकरी धडकल्याने पुन्हा तणाव वाढला.

टिकैत यांना अटक झाल्याचा दावा अफवा असल्याचे सांगण्यात आले. हरियाणाच्या पंचकुलामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. त्यांनी चंदीगडमध्ये राज्यपालांच्या निवासस्थानाला घेराव घातला होता. शेतकरी म्हणाले, राज्यपालांना नव्या कृषी कायद्याला रद्द करण्याची विनंती करणारे निवेदन सादर केले आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावे ‘रोष पत्र’ लिहिले. त्या पत्रात देखील तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.

पुढे काय : निवडणुकीवर बहिष्कार टाकणार
उत्तर प्रदेश:
संयुक्त किसान मोर्चाचे नेते गुरनामसिंह चढूनी म्हणाले, केंद्र सरकार आता जागे झाले नाही तर आगामी उत्तर प्रदेश व उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत त्याचा भाजपला फटका बसू शकतो. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत आम्ही भाजपला पराभूत करण्याचे आवाहन केले होते. अशाच प्रकारे यूपी व उत्तराखंडमध्येही करणार आहोत. आम्ही दर महिन्याच्या २६ तारखेला ट्रॅक्टर मार्च काढू. आता कोरोना संसर्ग कमी होत आहे म्हणून आंदोलन वाढवू.

हरियाणा : अलीकडेच संयुक्त किसान मोर्चाचे नेते प्रदीप धनखड म्हणाले, हरियाणातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी आम्ही बैठक घेतली. आम्ही राजस्थान व गुजरातमध्येही शेतकरी आंदाेलन तीव्र करणार आहोत. राज्यातील शेतकऱ्यांची एकजूट संपवण्यासाठी पंचायत निवडणुकीची तयारी केली जात असल्याचा आरोप धनखड यांनी केला. शेतकऱ्यांचे ऐकले नाही तर संपूर्ण हरियाणात पंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...