आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest Updates: Supreme Court Comment On Farmer Protest At Delhi Border; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलन:दिल्ली सीमेवर गाव वसवायचे असेल तर वसवा, मात्र दुसऱ्यांना त्रास देऊ नका : कोर्ट

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राच्या विनंतीमुळे 7 मेपर्यंत सुनावणी स्थगित

शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली सीमा बंद झाल्याने लोकांना होणाऱ्या अडचणींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कडक टिप्पणी केली. न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या पीठाने सांगितले की, लोक अनेक दिवसांपासून रस्त्यावर बसले आहेत. एखाद्याला तेथे गाव वसवायचे असेल तर वसवा, मात्र दुसऱ्यांच्या आयुष्यात बाधा आणू नका. सरकारलाही याबाबत काहीतरी करायला हवे. यावर केंद्र सरकारच्या वतीने उपस्थित सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, वाद सोडवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.

केंद्राच्या विनंतीवरून न्यायालयाने सुनावणी ७ मेपर्यंत स्थगित केली. नोएडातील मोनिका अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, कामानिमित्त त्यांना वारंवार दिल्लीला यावे लागते. आधी ते नोएडाहून २० मिनिटात दिल्लीला यायच्या, मात्र शेतकरी आंदोलनामुळे गाझीपूर सीमेवर रस्ता बंद आहे. यामुळे आता त्यांना दिल्ली यायला २ तास लागतात. हीच स्थिती सिंघू व टिकरी सीमेवरही आहे.

बातम्या आणखी आहेत...