आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
येथे न जातीची बाधा, ना धर्माचा अडसर. अन्नदात्याच्या आंदोलनात वेगवेगळ्या धर्मांचे आणि जातीचे लोक लंगर सेवेत सक्रिय आहेत. येथे प्रत्येक जण आपल्या भागातील प्रसिद्ध पक्वान्न बनवून खाऊ घालत आहे. हरियाणाचे हिंदू शेतकरी घरी बनवलेली लस्सी आणि थेट शेताच्या बांधावरून भाजीपाला घेऊनच येत आहेत. पंजाबचे शीख बांधव मक्याची भाकरी करू लागले आहेत. मुस्लिम समाजातील लोक विवाह समारंभात बनणारा गोड पुलाव जर्दा आंदोलकांत वाटप करू लागले.
शेतकरी आंदोलनामुळे कुंडली सीमा बंद आहे. कर्नाल, पानिपत, सोनिपत याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांतील भाजी उत्पादक दिल्लीच्या आझादपूर मंडईत भाजीपुरवठा करतात. परंतु, आता तो बंद आहे. सोनिपतमध्ये ३७ हजार हेक्टरमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन होते. कोबी, गाजर, बटाटे, सिमला मिरची, वांगी, हिरव्या पालेभाज्यांचा हा हंगाम आहे. सोनिपत भाजी मंडईत दररोज १२ हजार क्विंटल भाजीची आवक होत आहे. सोनिपतमध्ये आजूबाजूची भाजी आल्याने आठवड्यात दर निम्म्यावर आले आहेत. आता शेतकरी थेट बांधावरून आंदाेलनस्थळी मोफत भाजीपाला पोहोचवू लागले आहेत. कोबी, गाजर घेऊन आलेले शेतकरी रतन सिंह, प्रकाश म्हणाले, शेतकऱ्यांच्या या लढाईत भाजीपाल्याद्वारे भागीदारी देऊन सेवा करत आहोत.
दहिया खापने शेतकरी आंदोलनात रेशन-पाण्यासह मदत करण्याचे आवाहन गावोगावी केले आहे. शेतकरी आपल्या पातळीवर दूध, लस्सी घेऊन येत आहेत. रोहना गावातील प्रताप नंबरदार यांच्या गाडीने लस्सीने भरून आणणारे हर्ष, प्रशांत, प्रदीप म्हणाले, डेअरीशिवाय अनेक गावांतून सकाळी घराघरातून लस्सी व दूध आंदोलनासाठी एकत्र करून आणण्याचे काम तरुणांनी हाती घेतले आहे.
काही ३० लाखांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून, तर कुणी फॉर्च्युनरने आले
कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात शेतकरी ट्रॅक्टर, ट्रॉली घेऊन येऊ लागले आहेत. त्याशिवाय काही शेतकरी फॉर्च्युनसारख्या महागड्या गाड्यातून आले होते. पंजाबच्या अमृतसरहून आलेले परमजित सिंह म्हणाले, आमच्याकडे या गोष्टींचा शौक आहे. आम्ही केवळ महागडी गाडी घेतो. ट्रॅक्टरही लक्झरी असतो. आपला ट्रॅक्टर दाखवताना वाहनाच्या छताला एसी असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतीत खूप काम करताना त्यामुळे आराम मिळतो. ९ लाखांपासून एसी ट्रॅक्टर सुरू होतात. ३० लाखापर्यंत त्यांची किंमत असू शकते, असे त्यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांच्या मालकीच्या ट्राॅली दिसून आल्या. या ट्रॉलींमध्ये घरासारखे वातावरण दिसले. ट्रॅक्टरच्या बॅटरीच्या साह्याने टीव्हीची व्यवस्थाही होती. मोबाइल चार्जिंगचाही पर्याय होता. काही शेतकऱ्यांनी पंजाबहून पऱ्हाट्या आणल्या. ट्रॉलीच्या खालच्या भागात त्या टाकण्यात आल्या आहेत. आंदोलनात सहभागी बहुतांश तरुणांकडे बुलेट जास्त संख्येेने दिसून आल्या.
शीख गायक, दिल्ली पंजाबपासून लंगर सेवा
पंजाबमधील शीख शेतकरी मका, गव्हाचे पीठ, तांदूळ सोबत आणत आहेत. दिल्ली, पंजाबच्या गुरुद्वाऱ्यांपासून सामाजिक संस्थाही लंगर सेवेत सक्रिय आहेत. या सेवेत पंजाबचे लोकप्रिय गायक निंजा, मनकिरत आेलखा सहभागी झाले. आेलखा म्हणाले, शेतकरी एका जाती-धर्माचे नसतात. ते सर्वांचे असतात. गायक,अभिनेता, समाजसेवक, व्यापारी, मजुरांनी शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. दिल्लीहून आलेल्या उद्योजिका माधवी शर्मा म्हणाल्या, शेती, शेतकरी वाचला तरच देश पुढे जाऊ शकेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.