आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers' Question: Whether To Repeal The Law; Government Silent, Meeting Fruitless

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी नेत्यांना तारीख पे तारीख:शेतकऱ्यांचा प्रश्न : कायदा मागे घेता की नाही; सरकार गप्प, बैठक निष्फळ

नवी दिल्ली/कुंडली बॉर्डरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता संयुक्त राष्ट्र व 36 ब्रिटिश खासदारांचा पाठिंबा, ट्रुडो म्हणाले, आम्हीही सोबत आहोत

शेतकरी व केंद्रातील ५ व्या फेरीतील चर्चा शनिवारी पुन्हा निष्फळ ठरली. तत्पूर्वी, सकाळी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री नरेंद्र तोमर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व पीयूष गोयल यांच्यात खलबते झाली. यानंतर कृषिमंत्री तोमर, रेल्वेमंत्री गोयल व वाणिज्य राज्यमंत्री तथा पंजाबचे खासदार सोम प्रकाश यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. बैठक दुपारी २:३० ला सुरू होऊन साडेचार तास चालली. बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला. तसेच यापूर्वीच्या बैठकांची मुद्देसूद लेखी उत्तरे देण्याची मागणी केली. सरकारने त्याला होकार दर्शवला. आंदोलनातील वयोवृद्ध व मुलांना घरी पाठवावे, असे आवाहन कृषिमंत्री तोमर यांनी केले. शेतकरी म्हणाले, जोवर समाधान होणार नाही तोवर येथेच तळ ठोकून बसू. कुंडली बाॅर्डरवर आंदोलनादरम्यान दुर्घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पंजाबी गायक व अभिनेता दिलजित दोसांझ शनिवारी शेतकऱ्यांना भेटला. डाव्या पक्षांनीही शेतकऱ्यांच्या राष्ट्रव्यापी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

केंद्र सरकार
- बैठक सुरू झाल्यावर कृषिमंत्री तोमर यांनी शेतकऱ्यांना विचारले, तुम्हाला नव्या कायद्यांमध्ये काय दुरुस्ती हवी? दोष दूर केले जातील.
- तोमर यांनी पुनरुच्चार केला की, आम्ही दुरुस्तीसाठी तयार आहोत. तुम्ही सांगा काय दुरुस्ती हवी. सरकारला शेतकऱ्यांविषयी सहानुभूती आहे.

आंदोलक शेतकरी
- शेतकरी म्हणाले, प्रत्येक वेळी दुरुस्तीचे सांगता. कायदा रद्द करण्याविषयी बोला. दुरुस्तीला तयार आहात, याचाच अर्थ कायद्यात चूक आहे हे तुम्हीही जाणता.
- तोमरांचे पुन्हा तेच म्हणणे ऐकून शेतकऱ्यांनी खुर्च्या मागे घेतल्या आणि फलकावर "हो किंवा नाही' लिहून शांत बसून होते. मंत्री आवाहन करत राहिले.
यानंतर मंत्री निघून गेले. परत येऊन म्हणाले, आणखी वेळ द्या. ९ डिसेंबरला पुन्हा बैठकीचा निर्णय घेण्यात आला. - भाकियू उगराहाचे राज्य प्रमुख जोगिंदर सिंह यांनी दिलेली माहिती.

जेथे शांततेत आंदोलन, तेथे आम्ही सोबत असू
जगात जेथे कुठेही शांततेत आंदोलन होत असेल, आमचा कॅनडा देश नेहमीच त्यांच्यासोबत राहील. आम्हाला समस्या सोडवण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले पाऊल व सुसंवादाबाबत आशा असेल. -जस्टिन ट्रुडो, पीएम, कॅनडा

यूएन: भारतात शेतकऱ्यांना आंदोलनाचा हक्क
भारतात शेतकऱ्यांना शांततेने आंदोलन करण्याचा हक्क आहे. त्यांना परवानगी द्यायला हवी. -स्टीफन डुजारिक, संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते

ब्रिटिश खासदारांनी दबाव टाकण्यासाठी लिहिले पत्र
लेबर पक्षाचे तनमनजित सिंह धेसी यांच्या नेतृत्वात ब्रिटनच्या ३६ खासदारांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. ब्रिटिश परराष्ट्र सचिव डॉमिनिक रॅब यांना कृषी कायद्यांविरोधात भारतावर दबाव टाकण्याबाबत लिहिले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser