आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सरकारशी झालेली 12 व्या फेरीतील चर्चा अयशस्वी झाली. यानंतर शेतकरी संघटनांनी आंदोलनात हिंसाचाराचा कट रचल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी रात्री शेतकरी आंदोलनाच्या सुरक्षा समितीने सिंघु सीमेवरुन एका व्यक्तीला अटक केली. शेतकरी नेत्यांनी त्याला माध्यमांसमोर आणले, जिथे त्यांनी सांगितले की 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चाच्या दिवशी 4 शेतकरी नेत्यांना गोळ्या झाडण्याची सूचना देण्यात आली होती.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने म्हटले की, त्याला हे निर्देश हरियाणा पोलिसांचा एक अधिकारी प्रदीपने दिले होते. मात्र या दाव्यावर अद्याप सरकार किंवा हरयाणा पोलिसांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणात आम आदमी पक्षाने म्हटले की, आमची सर्वात वाईट भिती खरी ठरली आहे. यावरुन समजते की, ते (केंद्र सरकार) कशाप्रकारे शेतकरी आंदोलन संपवू इच्छित आहेत.
शेतकऱ्यांनी ज्याला समोर आले, तो म्हणाला - 'ज्यांना मारायचे होते त्यांचे फोटो मिळाले होते'
पकडलेल्या व्यक्तीने सांगितले की, 'आमची योजना होती की 26 जानेवारीला आम्ही पहिल्या लाइनवर गोळ्या झाडू. यानंतर दिल्ली पोलिस शेतकऱ्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करतील. जर ते थांबले नाहीत तर त्यांना गोळी घालण्याचा आदेश आहे. मागून आमची टीम, ज्यात हरियाणाचे 8-10 मुले असतील, ते गोळ्या झाडतील करतील. पोलिसांना वाटेल की, शेतकऱ्यांनी गोळ्या झाडल्या आहेत.
तसेच तो पुढे म्हणाला, 'ट्रॅक्टर रॅलीमध्ये गँगचे अर्धे लोक पोलिसांच्या वेशात असतील, जे शेतकऱ्यांना पांगवतील. यानंतर मंचावर जे चार लोक (शेतकरी नेता) असतील त्यांना शूट करण्याचा प्लान आहे. 4 लोकांचा फोटो आम्हाला देण्यात आला आहे. आम्हाला हे काम प्रदीप सिंह (SHO)यांनी सोपवले आहे. आम्ही त्याला पोलिस स्टेशन समोर कधीच पाहिले नाही. जेव्हाही आम्हाला भेटायला येत होता, तेव्हा चेहरा कव्हर करुन येत होता. ज्या लोकांना मारायचे होते, त्यांची नावे आम्हाला माहिती नाही, त्यांचा फोटो आमच्याकडे होता. '
अमरिंदर सिंह म्हणाले होते - आंदोलनात धोकादायक लोक घुसखोरी करु शकतात
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी शुक्रवारी केंद्र आणि शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादावर चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, जर या आंदोलनावर तोडगा लवकर निघाला नाही तर आंदोलनात चुकीचे आणि धोकादायक लोक घुसखोरी करु शकतात.
अमरिंदर म्हणाले होते की, केंद्र सरकारला या प्रकरणाची गंभीरता कळायला हवी. पंजाब बॉर्डरजवळील प्रदेश आणि येथील 80 हजार शेतकरी दिल्ली बॉर्डवर 57 दिवसांपासून संघर्ष करत आहे. असेच सुरू राहिले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.