आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये 26 जानेवारीला होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी दिली आहे. दिल्ली पोलिसांचे स्पेशल कमिश्नर (इंटेलिजेंस) यांनी रविवारी सांगितले की, 'दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीसाठी टीकरी, सिंघू आणि गाजीपूर बॉर्डरवरुन तीन रस्ते ठरवले आहेत.' दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीसाठी काही अटीदेखील ठेवल्या आहेत. यासोबतच पोलिसांनी शेतकरी रॅलीमध्ये पाकिस्तानकडून कट रचला जात असल्याचा इशारीही दिला आहे.
पोलिसांनी सांगितले की, सीमेपलीकडून शेतकरी आंदोलनात हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले आहे. दिल्ली पोलिसांचे स्पेशल कमिश्नर दीपेंद्र पाठक म्हणाले की, 'शेतकऱ्यांच्या रॅलीमध्ये हिंसाचार घडवला जाणार असल्याचे अनेक इनपुट मिळाले आहेत. 13 जानेवारी ते 18 जानेवारीदरम्यान केलेल्या तपासात समोर आले की, आंदोलनात हिंसाचार घडवण्यासाठी 308 ट्विटर हँडल पाकिस्तानात तयार करण्यात आले आहेत.
पोलिस म्हणाले- शेतकऱ्यांना सोबत घेऊन काम करणार
पोलिस कमिश्नर पुढे म्हणाले की, 26 जानेवारीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची गडबड रोखण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि दुसऱ्या ग्रुप्ससोबत बातचीत झाली आहे. 26 जानेवारीवा सिक्योरिटी अरेंजमेंट आणि रॅलीच्या सुरक्षेवर भर दिला जाईल.
शेतकऱ्यांनी फक्त ट्रॅक्टर घेऊन यावे, ट्रॉली घेऊन येऊ नका
शेतकरी आंदोलनाशी संबंधित स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी शेतकऱ्यांना अपील केली आहे की, त्यांना 26 जानेवारीला होणाऱ्या रॅलीसाठी फक्त ट्रॅक्टर घेऊन यावे, ट्रॉली आणू नयेत.
100 किलोमीटरच्या रॅलीचा 45 किमी भाग दिल्लीत - शेतकरी
शेतकर्यांनी या रॅलीचे नाव 'शेतकरी गणराज्य परेड' ठेवले आहे. भारतीय शेतकरी संघटनेचे युद्धवीर सिंह यांनी रॅलीच्या मार्गाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही सिंघू बॉर्डरपासून दिल्लीत 10 किलोमीटर आतमध्ये प्रवेश करू. त्यानंतर संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर, बवाना, कंझावाला, कुतुबगड मार्गे चंडी सीमेवर पोहचू. त्यानंतर आम्ही हरियाणात जाऊन पुन्हा सिंघूत दाखल होऊ. दरम्यान 100 किलोमीटरच्या या मोर्चातील 45 किमी भाग दिल्लीत असेल असेही त्यांनी सांगितले.
शांततापूर्ण रॅलीला मंजुरी, दिल्लीत राहू दिले जाणार नाही
या आंदोलनाशी संबंधित स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी शनिवारीच सांगितले की, दिल्ली पोलिस आणि शेतकऱ्यांमधील चर्चा निष्कर्षापर्यंत पोहोचली आहेत. 26 जानेवारी रोजी पोलिस बॅरिकेड्स उघडतील आणि आम्ही दिल्लीत प्रवेश करू.
काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे की, शेतकर्यांना शांततेत ट्रॅक्टर रॅली काढावी लागणार आहे. मोर्चानंतर निदर्शकांना दिल्लीत थांबू दिले जाणार नाही. त्यांना पुन्हा सीमावर्ती ठिकाणी जावे लागेल जेथे दोन महिन्यांपासून ते कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.