आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Will Plant Special Vegetables For The Army At Minus 40 Temperatures; Ground Report From Unit Defense Institute Of High Altitude Research

लेह:उणे 40 तापमानात लष्करासाठी खास भाज्या लावतील शेतकरी; युनिट डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अॅल्टिट्यूड रिसर्चमधून ग्राउंड रिपोर्ट

उपमिता वाजपेयी | लेह2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लडाखमध्ये आजवर फक्त 4 भाज्या घेत असत, आता 78 भाज्या

पुढील महिन्यात लडाखला देशातील इतर भागाशी जोडणारे दोन्ही रस्ते बंद होतील. किमान ६ महिन्यांपर्यंत या भागात गरजेनुसार हवाई मार्गाचा आधार घ्यावा लागणार आहे. याचा मोठा परिणाम भाज्या व फळांच्या पुरवठ्यावर होणार आहे. लडाखमध्ये १९६२ पूर्वी फक्त ४ भाज्या लावल्या जात होत्या. आता येथील शेतकरी २५ भाज्या घेत आहेत. लॅबमध्ये ७८ भाज्यांवर संशोधन सुरू आहे. लेहमध्ये डीआरडीओच्या युनिट डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अॅल्टिट्यूड रिसर्चने यासाठी शेतकऱ्यांना खास प्रशिक्षण दिले आहे. याचे महत्त्व यासाठी की, लडाखमध्ये तापमान उणे ३० हून उणे ४० डिग्री सेल्सियसपर्यंत वाढते. अशा तापमानात भाज्या घेणे अशक्य असते. सैनिकांना ताज्या भाज्या मिळाव्यात, बर्फवृष्टीत रस्ते बंद झाल्यानंतरही लॅबने त्यांचे तंत्रज्ञान, गलवान, पँगाँग, देमचोक, दौलत बेग ओल्डियासारख्या सीमेलगतच्या भागात पोहोचवले आहे.

विशेष म्हणजे, लेहपासून १२ किमी दूर फे गावातील लोकांनी गेल्या महिन्यात ५० टन टरबूज काढण्याचा विक्रम केला आहे. हे तंत्रज्ञान त्यांनी डीआरडीओकडून घेतले आहे. २०१६ मध्ये या गावातील १० शेतकऱ्यांनी चाचणी घेतली होती. सध्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अॅल्टिट्यूड रिसर्च भारतीय लष्करासाठी बंकरमध्ये मायक्रोग्रीन्स घेण्याच्या तंत्रावर काम करत आहे. इतकेच नव्हे तर सीमेलगतच्या भागात भाज्या साठवून ठेवण्यासाठी खास भूमिगत स्टोअरेज तंत्रज्ञान आणले आहे. येथे थंडीच्या काळात तीन ते चार महिन्यांपर्यंत भाज्या स्टोअर केल्या जाऊ शकतात. त्याही कार्बनचे उत्सर्जन न होता. या स्टोअरेजची गरज भासल्यास सैनिक बंकर म्हणून त्याचा वापरही करू शकतात. या स्टोअरेजमध्ये सहा महिन्यांपर्यंत बटाटे साठवण करता येतात. या बंकरची क्षमता २० ते १०० टनांपर्यंत असू शकते.

१०१ प्रकारच्या भाज्या घेण्याचा विक्रम

११ हजार फूट उंचीवर खास लॅब-रिसर्च सेंटरच्या भागात एका मोसमात १०१ प्रकारच्या भाज्या घेण्याचा विक्रम आहे. याच लॅबमुळे लडाखमध्ये लष्कराची ५० टक्के ताज्या अन्नाची गरज पूर्ण होते. दरवर्षी ही लॅब भाज्यांची २५ लाख रोपे लडाखमध्ये वाटते. गेल्या तीन वर्षांपासून सीमेलगत लष्कराच्या युनिट्समध्ये २०० ट्रेंच ग्रीनहाऊस अथवा अंडरग्राउंड व्हेजिटेबल बेड्स तयार करण्यात आले आहेत. याच तंत्राने शेतकऱ्यांना गेल्या वर्षी ३.५ मेट्रिक टन फळांचा पुरवठा लष्करास केला होता.

चीन सीमेवर गस्तीसाठी उंट

पाठीवर दोन उंचवटे म्हणजे दोन मदार असलेले उंट गस्तीसाठी वापरले जातात. हे उंट फक्त लडाखच्या हुंडर भागात आढळतात. भारतीय लष्कर गस्त व सामानाचे ओझे वाहून नेण्यासाठी त्यांचा वापर करत आहेत. कारण चीनलगतच्या सीमेवर रस्ते नसल्याने तेथे खेचरेही जाऊ शकत नाहीत. या उंटांची संख्या चारशेच्या जवळपास आहे. यासाठी राजस्थान व हुंडर दोन्ही ठिकाणांहून उंट मागवले आहेत. हे उंट दौलत बेग ओल्डी व जवळपासच्या भागात, जेथे वाळवंट आहे तेथे चांगली कामगिरी पार पाडतील. ते एका वेळी १७० किलो सामान वाहून नेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...