आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारूख अब्दुल्लांचे मोठे विधान:म्हणाले - श्रीराम केवळ हिंदूंचे नव्हे तर सर्वांचे होते, कोणताही धर्म वाईट नाही, व्यक्ती भ्रष्ट असतो

जम्मू/श्रीनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फ्रंसचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी भगवान श्रीरामांविषयी महत्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले - भगवान राम सर्वांचे आहेत. ते केवळ हिंदू धर्मियांचे नाहीत. फारुख शनिवारी अखनूरमधील एका कारखान्याच्या उद्घाटनासाठी आले होते.

यावेळी ते म्हणाले - कोणताही धर्म वाईट नसतो. व्यक्ती भ्रष्ट असतो. भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले की, ते निवडणुकीतच हिंदू धोक्यात असल्याचा नारा देतात. पण एरवी कुणाला विचारतही नाहीत. त्यामुळे जनतेने भाजपच्या थापांना बळी पडू नये.

फारुख म्हणाले - जम्मू काश्मीरमध्ये लवकर निवडणूक घेण्याची गरज

ते म्हणाले - आम्हाला येथे 50 हजारांच्या नोकऱ्यांची ग्वाही दिली होती. ते कुठे आहे? आमचे डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ व आमची सर्वच मुले बेरोजगार आहेत. हे एका राज्यपालाच्या माध्यमातून करता येत नाही. तुम्ही त्याला उत्तरदायी ठरवू शकत नाही. येथे निवडणूक घेण्याची गरज आहे.

'माझ्या वडिलांनी 1947मध्ये भारताची निवड केली'

फारुख भारताच्या फाळणीचा उल्लेख करत म्हणाले की, 1947 साली काश्मीरवर आदिवासींनी हल्ला केला तेव्हा जिन्ना यांनी माझे वडील शेख अब्दुल्लांपुढे जम्मू काश्मीर पाकिस्तानात विलिन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण त्यांनी स्पष्ट नकार देऊन भारताची निवड केली. फारुख म्हणाले - पाकची विद्यमान स्थिती पाहून आम्हाला त्याचा आनंद वाटतो. तेथील माजी पंतप्रधान इम्रान खान यांना गोळी घालण्यात आली. जनतेऐवजी लष्कराच्या हातात सत्ता आहे. याऊलट भारतात सर्वसामान्य नागरिकांच्या हातात ताकद आहे.

ते पुढे म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही सरकार नाही. यामुळे येथील जनतेला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. येथे लवकर निवडणूक झाली पाहिजे. यामुळे येथील नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधींची निवड करून आपल्या समस्या सोडवता येतील. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याचीही मागणी केली. जम्मू काश्मीर पुन्हा लडाखमध्ये मिसळून जम्मू काश्मीर पुन्हा राज्य होईल, असे ते म्हणाले.

फारुखने नॅशनल कॉन्फ्रंसच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

फारुख अब्दुल्लांनी 2 दिवसांपूर्वीच नॅशनल कॉन्फ्रंसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते - आता पक्षाची सूत्रे नव्या पीढीकडे सोपवण्याची वेळ आली आहे. आमच्या पक्षात कोणताही नेता अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतो. आमच्या पक्षाचा लोकशाहीवर विश्वास आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक 5 डिसेंबर रोजी होईल. दरम्यान, फारुख यांचे सुपुत्र ओमर अब्दुल्ला यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...