आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farooq Abdullah | Supreme Court Dismiss Petition Against Jammu Kashmir NCP Leader

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फारुख अब्दुल्ला यांच्या विरोधातील PIL फेटाळली:सर्वोच्च न्यायालयाने म्हटले - 'सरकारपेक्षा वेगळा विचार करणे म्हणजे राजद्रोह नाही; याचिकाकर्त्यांना 50 हजार रुपये दंड'

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अब्दुल्ला यांच्या विरोधात दाखल केलेला अर्ज फेटाळून लावून याचिकाकर्त्यांना कोर्टाने 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

सरकारच्या मतांपेक्षा भिन्न मते असणे याला देशद्रोह म्हणता येणार नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या विरोधात दाखल केलेली जनहित याचिका फेटाळताना न्यायमूर्ती किशन कौल आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने ही प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या विरोधात अब्दुल्ला यांच्या वक्तव्याविषयी ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. अब्दुल्ला यांनी देशाविरोधात वक्तव्य केले आहे, त्यामुळे त्यांना खासदारपदावरून काढून टाकले पाहिजे, असे याचिकेत म्हटले आहे.

अब्दुल्ला यांच्या विरोधात दाखल केलेला अर्ज फेटाळून लावून याचिकाकर्त्यांना कोर्टाने 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याचिकाकर्ता रजत शर्मा आणि काही जण फारूक अब्दुल्ला यांच्याविरोधात कोर्टात पोहोचले होते. अब्दुल्ला यांनी कलम 370 हटवण्याविरूद्ध चीन आणि पाकिस्तानकडून मदत मागितली असा दावा त्यांनी केला.

काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की फारूक अब्दुल्ला यांनी टीव्ही मुलाखतीत म्हटले होते की चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू केला जाईल. मात्र त्यांच्या पक्षाच्या नॅशनल कॉन्फरन्सने (NC) हा दावा फेटाळला होता.

फारूक अब्दुल्ला हे श्रीनगरचे नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आहेत. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने फारुख अब्दुल्ला आणि त्याचा मुलगा उमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवले होते.

बातम्या आणखी आहेत...