आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानात निवडणूक होण्यापूर्वी काँग्रेसमध्ये पुन्हा बंडखोरीचा बिगुल वाजला आहे. हायकमांडने आक्षेप घेतल्यानंतरही माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मंगळवारी आपल्याच सरकारविरोधात जयपूर येथे ५ तास उपोषण केले. मागील भाजप सरकारच्या काळात ४५ हजार कोटींच्या खाण घोटाळ्याची चौकशी न करण्यामध्ये मुख्यमंत्री अशोक गहलाेत व माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांची मिलीभगत असल्याचा आराेप पायलट यांनी केला होता. पायलट यांच्या मागे लागलेल्या पोस्टरवर घोटाळ्याची चौकशी न करण्यामध्ये सीएम गहलोत व माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची मिलीभगत असल्याचा त्यांनी आरोप केला होता.
उपोषण संपल्यानंतर पायलट म्हणाले, ‘आम्ही निवडणुकीपूर्वी भाजप सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्वासन लोकांना दिले होते. मात्र, कारवाई झाली नाही. मी अनेकदा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. निवडणुकीला ६-७ महिने बाकी आहेत. म्हणून उपोषण करावे लागले. आतातरी कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे.’ उपोषणाच्या एक दिवस आधी काँग्रेसचे राजस्थान प्रभारी सुखजिंदरसिंह रंधावा म्हणाले होते, पायलट यांनी उचललेले पाऊल काँग्रेसच्या हितांविरुद्ध आहे. त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर आपले म्हणणे मांडले पाहिजे.
दबाव बनवण्याचा प्रयत्न : दोघांमधील २०१८ च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होण्यावरून सुरू झालेला वाद कायम आहे. असे म्हटले जात आहे की, पायलट निवडणुकीपूर्वी टिकिट वाटपात आपली दखल वाढवण्यासाठी दबाव बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. उपोषणामध्ये कोणतेच मंत्री व आमदार सहभागी झाले नाही.
सचिन यांच्या समर्थनार्थ पुढे आले सिंहदेव : छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाची दावेदारी करणारे काँग्रेसचे असंतुष्ट नेते टी. एस. सिंहदेव म्हणाले की, पायलट यांनी कोणतीच लक्ष्मण रेषा ओलांडली नाही. ते म्हणाले होते, वसुंधरा राजेंचे सरकार असताना भ्रष्टाचाराची चौकशी करतील, पण आमच्या सरकारने ती केली नाही. आता तुम्ही जनतोसमोर जाल तर जनता तुम्हाला उत्तर मागेल.
गहलोत यांनी जारी केले २०३० व्हिजन : मुख्यमंत्री गहलोत यांनी मंगळवारी राजस्थानला आघाडीचे राज्य बनवण्यासाठी व्हिजन २०३० चा व्हिडिओ जारी केला. एकप्रकारे हा व्हिडिओ निवडणुकीनंतर त्यांची खेळी कायम राहण्याचा संकेत असल्याचे म्हटले जात आहे. पवारांचा यू-टर्न, विरोधकांच्या एकजुटीसाठी जेपीसीचा विरोध करणार नाही : अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या आरोपांची जेपीसीमार्फत चौकशी करण्यास विरोध असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. मात्र, हे वक्तव्य त्यांनी मागे घेतले आहे. ते मंगळवारी म्हणाले, मी विरोधकांच्या एकजुटीसाठी जेपीसीला विरोध करणार नाही. विरोधी पक्षातील आमचे मित्र जेपीसीमार्फत चौकशीवर भर देत असतील तर एकजुटीसाठी आम्ही त्याला विरोध करणार नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.