आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fatal Attacks On Bihari Laborers In Tamil Nadu, Target Killing; Escape From Hiding

दोन हत्यांचा आरोप:तामिळनाडूत बिहारी मजुरांवर जीवघेणे हल्ले, टार्गेट किलिंग; लपून पलायन

जमुई (बिहार)21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूत बिहारी मजुरांवर सातत्याने हल्ले होत आहेत. ते कमी रोजंदारीवर काम करत असल्याने स्थानिक लोक चिडलेले आहेत. ते ठराविक रोजंदारीपेक्षा कमी पैसे घेऊन दर पाडत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. स्थानिकांच्या हल्ल्यांत जमुईच्या पवनची १९ फेब्रुवारीला आणि मोनूची २५ फेब्रुवारीला हत्या केल्याचा आरोप होत आहेत. तामिळनाडूच्या कोइम्बतूर, बाढावली, त्रिपुरमध्ये टार्गेट किलिंगचे वृत्त आहे.

बिहारला परत आलेले धधौरचे मनोरंजन म्हणाले, जखमींमध्ये महिलाही आहेत. दहशतीत असलेले मजूर रात्री रेल्वेत लपून परतत आहेत. तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांत मजूर अडकले आहेत.

मजूर म्हणाले, पोलिस गप्प तामिळनाडूतून िबहारला आलेले अरमान सांगतात, हिंदी बोलणाऱ्या बिहारी मजुरांवर सातत्याने हल्ले होत आहेत. पोलिस समाजकंटकांवर कोणतीच ठोस कारवाई करत नाहीत. परिणामी बिहारी मजुरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

विधानसभेत गोंधळ, नितीश म्हणाले, सर्वांना संरक्षण मिळेल िबहार विधानसभेत गुरुवारी या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते भाजपचे सम्राट चौधरी म्हणाले, सरकार संरक्षण देण्यात अपयशी ठरले. तामिळनाडूत राहणाऱ्या बिहारी मजुरांना संरक्षण मिळेल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...