आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fatal Bus car Accident In Madhya Pradesh, 11 Killed: 11 Laborers Returning Home Died In The Accident, 2 Children Were Among The Dead

मध्यप्रदेशात बस-कारचा भीषण अपघात, 11 ठार:घरी परतणाऱ्या 11 मजुरांचा अपघातात मृत्यू, मृतांमध्ये 2 मुलांचा समावेश

बैतुल25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यप्रदेशात कारमधून घरी परतणाऱ्या 11 मजुरांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. बचावलेल्या कार चालकाने सांगितले की, त्याला डुलकी लागली तेवढ्यात बसची धडक बसली.

मध्य प्रदेशातील बैतुल-अमरावती राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास रिकामी प्रवासी बस आणि तवेरा कारची धडक झाली. कारमधील 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 पुरुष, 3 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. सर्व मृतदेह झल्लार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले असून तेथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस बैतूलच्या दिशेने येत होती, तर कार मजुरांसह परतवाड्याकडून येत होती. बस झालर गावापासून एक किलोमीटर अंतरावर आली असता दोघांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील सर्व 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी लोकांच्या मदतीने 11 पैकी 7 मृतदेह बाहेर काढले. उर्वरित 4 मृतदेह कारचा पत्रा कापून काढण्यात आले.

मजूर सोयाबीन कापण्यासाठी गेले होते
झालर पोलिस स्टेशनचे टीआय दीपक पराशर यांनी सांगितले की, अपघाताची माहिती डायल-100 वरून रात्री 2 वाजता मिळाली. सोयाबीनची कापणी करणारे मजूर घेऊन ही कार अमरावती जिल्ह्यातून झल्लारच्या दिशेने येत होती. त्याचवेळी बस खेडीहून गुडगावच्या दिशेने जात होती. तवेरामध्ये 11 जण होते, ते सर्वजण अडकून पडले होते. मृतांमध्ये दीड वर्षाच्या मुलाचा आणि एका 5 वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.

प्रत्यक्षदर्शी मनीष सांगतात की, ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा सर्वांचा मृत्यू झाला होता. प्रथम जेसीबीच्या साहाय्याने बस आणि कार वेगळी करण्यात आली. यानंतर कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

ड्रायव्हर म्हणाला - डुलकी लागली होती
एसपी सिमला प्रसाद यांनी सांगितले की, झल्लार गावातील मजूर 20 दिवसांपूर्वी अमरावतीच्या कलमाता गावात गेले होते. गुरुवारी रात्री नऊ वाजता कारमधून घराकडे निघाले होते. रात्री 2च्या सुमारास ते झल्लार गावापासून एक किमी अंतरावर असताना हा अपघात झाला. कार चालकाने पोलिसांना सांगितले की, त्याला डुलकी लागली होती, त्यामुळे तवेरा थेट बसला धडकली.

मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई
जिल्हाधिकारी अमनवीर सिंह बैंस यांनी सांगितले की, कारमधील सर्व 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 मुलांचा समावेश आहे. तत्काळ पोस्टमॉर्टम करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह त्यांच्या गावी नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अंत्यसंस्काराच्या रकमेबाबतही कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक अपघातात देण्यात आलेली नुकसानभरपाईची रक्कमही कुटुंबाकडून तातडीने स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...