आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Father in law Fires At Police After Quarrel With Daughter In Law, Latest News And Update

​​​​​​​सासऱ्याने सुनेचा राग पोलिसांवर काढला:प्रथम पत्नी, मुलगा-सुनेला बंधक बनवले, नंतर पोलिसांवर 45 गोळ्या झाडल्या

कानपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूरच्या श्यामनगर भागातील एका व्यक्तीने सुनेसोबत झालेल्या भांडनामुळे तब्बल 3 तास गोंधळ घातला. अवघ्या 300 रुपयांसाठी सुरू झालेल्या या वादात सासऱ्याने आपली पत्नी, मुलगा व सुनेला एका खोलीत बंद केले. त्यानंतर घर पेटवून देण्याची धमकी दिली. घाबरलेल्या सुनेने तत्काळ त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस कौटुंबिक वाद म्हणून घटनास्थळी पोहोचली असता सासऱ्याने थेट त्यांच्यावरच गोळीबार केला.

त्याने घराच्या छतावर जाऊन आपल्या डबल बॅरल बंदुकीने पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. त्यात इन्स्पेक्टर व 2 शिपाई जखमी झाले. 3 तासानंतर डीसीपी ईस्ट प्रमोद कुमार, एसीपी केंट मृगांक शेखर पाठक, एडीसीपी राहुल मिठास यांनी 6 पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवले.

जवळपास 3 तासांच्या गोंधळानंतर पोलिसांनी आर.के. दुबे याच्या मुसक्या आवळल्या.
जवळपास 3 तासांच्या गोंधळानंतर पोलिसांनी आर.के. दुबे याच्या मुसक्या आवळल्या.

सुनेसोबतच्या वादानंतर गोंधळ

सी-ब्लॉकमध्ये राहणारे आर.के. दुबे (60) हे शेअर मार्केटमध्ये काम करतात. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी किरण दुबे, मोठा मुलगा सिद्धार्थ, सून भावना आणि दिव्यांग मुलगी चांदनी राहते. त्यांचा लहान मुलगा राहुल व सून जयश्री वेगळे राहतात. रविवारी दुपारी 12 वाजता आर.के. दुबेंचा सुनेसोबत वाद झाला.

त्यानंतर त्यांना राग अनावर झाला. यावेळी भांडण मिटवण्यासाठी आलेल्या पत्नीसह सून व मुलाला त्यांनी एका खोलीत बंद केले. त्यानंतर संपूर्ण घर पेटवून देण्याची धमकी दिली.

काही वेळासाठी परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली होती की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी थेट आपली पिस्तुल बाहेर काढली.
काही वेळासाठी परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली होती की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी थेट आपली पिस्तुल बाहेर काढली.

सुनेचा पोलिसांना फोन; म्हणाली - वाचवा

खोलीत बंद असलेली सून भावना हिने तत्काळ पोलिसांना फोन केला. ती म्हणाली- वाचवा, नाहीतर सासरा आमचा जीव घेईल. त्यानंतर चाकेरी पोलिसानी तत्काळ तिच्या घरी धाव घेतली. त्यांना पाहून वृद्धाच्या संतापाचा पारा अधिकच वाढला. 'मी स्वत: पीडित असून, तुम्ही लोक मला पकडण्यासाठी माझ्या घरी आलात,' असे ते ओरडून म्हणाले. त्यानंतर त्यांनी आत जाऊन त्यांनी आपली डबल बॅरल बंदूक आणली व गेटवर उभ्या असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. गोळी लागल्याने इन्स्पेक्टर विनीत त्यागी व 2 शिपाई जखमी झाले. या प्रकारामुळे पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला.

3 आयपीएस अधिकाऱ्यांसह 6-8 पोलिस ठाण्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी चारही बाजूंचे रस्ते अडवून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
3 आयपीएस अधिकाऱ्यांसह 6-8 पोलिस ठाण्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी चारही बाजूंचे रस्ते अडवून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
वृद्धाला अटक केल्यानंतर परिसरातील लोक बाहेर आले. सुमारे ३ तासांपासून आजूबाजूचे लोक आपापल्या घरात लपून बसले होते.
वृद्धाला अटक केल्यानंतर परिसरातील लोक बाहेर आले. सुमारे ३ तासांपासून आजूबाजूचे लोक आपापल्या घरात लपून बसले होते.

45 राऊंड फायर

आरोपी सासऱ्याने 3 तासांत पोलिसांवर 40 ते 45 राऊंड गोळीबार केला. डीसीपी ईस्ट यांनी लाऊडस्पीकरच्या मदतीने वृद्धांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर वृद्ध डीसीपींना म्हणाला, "पोलिस माझ्या घरी कसे आले. तो निलंबित होत नाही तोपर्यंत गोळीबार सुरूच राहील." त्यानंतर डीसीपींनी त्याला दाखवण्यासाठी टाईप केलेले निलंबन पत्र मागवण्याचे निर्देश दिले. ते वृद्धांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले. ते पाहिल्यानंतर वृद्धाने गोळीबार थांबवला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

वृद्धाच्या घराकडे जाणारा रस्ता पोलिसांनी चारही बाजूंनी बंद केला होता.
वृद्धाच्या घराकडे जाणारा रस्ता पोलिसांनी चारही बाजूंनी बंद केला होता.

डबल बॅरल बंदूक, 45 पुंगळ्या, 60 जिवंत काडतुसे जप्त

आर.के. दुबे यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची परवाना असलेली डबल बॅरल बंदूक जप्त केली. तपासणीत छतावर सुमारे 45 पुंगळ्या व 60 हून अधिक जिवंत काडतुसे सापडली. दुबे यांच्याकडे रिव्हॉल्व्हर असल्याचेही जावयाने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली पण ते सापडले नाही. पोलिस आता रिव्हॉल्व्हर जप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. आर.के. दुबे हे शेअर्सचे व्यवहार करतात.

वृद्धाला अटक केल्यानंतर आजूबाजूचे लोक घराबाहेर आले. पोलिसांनी 3 तासांपर्यंत त्यांना घराबाहेर पडण्यास मनाई केली होती.
वृद्धाला अटक केल्यानंतर आजूबाजूचे लोक घराबाहेर आले. पोलिसांनी 3 तासांपर्यंत त्यांना घराबाहेर पडण्यास मनाई केली होती.
बातम्या आणखी आहेत...