आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Father Leaves Daughter In Orphanage For Second Marriage, 70 year old Grandmother Runs To Court; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:दुसऱ्या लग्नासाठी वडिलांनी मुलीला अनाथाश्रमात सोडले, ७० वर्षांच्या आजीची कोर्टात धाव; मुलगी म्हणाली-आजीसोबत राहायचे

सुरत (गुजरात)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरातचे प्रकरण; भेदरलेल्या मुलीला जजने जवळ बसवले, अनाथाश्रमाला फटकारले

गुजरातच्या सुरत शहरात ७० वर्षांच्या आजीने नातीसाठी आपल्या मुलाविरुद्ध खटला गुदरला.त्याचे झाले असे, मुलाने दुसरे लग्न करण्यासाठी ११ वर्षांच्या मुलीला अनाथाश्रमात सोडले होते. मुलाने हा प्रकार आईला सांगितला नव्हता. मात्र, जेव्हा आईच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर ती नातीला घेऊन येण्यासाठी अनाथाश्रमात पोहोेचली. अनाथाश्रमाने मुलीला सोपवण्यास नकार दिला. यावर आजीने न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने सर्च वॉरंट जारी करत पोलिसांना मुलीस कोर्टात हजर करण्याचे आदेश बजावले. यानंतर मुलीला अनाथाश्रमातून कोर्टात आणले. मी २५ दिवसांपासून आजीकडे जाण्यासाठी विनवणी करत असल्याचे मुलीने रडत सांगितले. त्यावर न्यायालयाने मुलीला आजीकडे सोपवण्याचे आदेश बजावले. नात कोर्टात जेव्हा आजीच्या गळ्यात पडली तिला अश्रू अनावर झाले. हे दृश्य पाहून न्यायमूर्तीसह सर्वच भावूक झाले.

वडिलांना दारूचे व्यसन: मुलीला फिरायला नेले अन् अनाथाश्रमात सोडले
अॅड. विलास पाटील यांनी सांगितले की, राजेशला(नाव बदलले) लग्नानंतर तीन अपत्ये झाली. चार वर्षापूर्वी पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाला होता. मोठा मुलगा आणि मुलगी वडिलासोबत, तर लहान मुलगी आईसोबत राहत होती. राजेशला दारूचे व्यसन आहे. कंडक्टर असलेल्या राजेशने २५ दिवसांपूर्वी कुणालाही न सांगता मुलीला अनाथाश्रमात सोडले. आईने विचारल्याने टोलवाटोलवी उत्तरे दिले. वारंवार विचारल्यावर अनाथाश्रमात सोडल्याचे सांगितले.

आजीला भेटताच नात गळ्याशी पडून रडली
याचिका दाखल करताच न्यायालयाने सलाबतपुरा पोलिसांना मुलीला कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले होते. कोर्टात आजीला पाहताच नात तिला मिठी मारत मोठमोठ्याने रडू लागली. मुलगी कोर्टात दाखल झाल्यावर पिंजऱ्यात जाऊन उभी रहिली. खूप भेदरलेली होती. न्यायमूर्तींनी तिला जवळ घेऊन बसवले व बोलण्यास सांगितले. मुलीने आजीकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायालयाने त्यास मंजुरी देत आपल्या टिप्पणी म्हटले की, मुलीला कोणत्या अाधारावर अनाथाश्रमात ठेवले, संस्थेवर दंड का लावू नये.

बातम्या आणखी आहेत...