आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशच्या हरदोईत राहणारी एक महिला...आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच्याच नवऱ्याविरोधात गेली. न्यायाच्या या लढ्यात तिला कुणाचीही साथ मिळाली नाही. तिला 3 मुलांसह घर सोडावे लागले, पण ती हरली नाही. अखेर, तिच्या पतीला पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा मिळाली अन् तिच्या संघर्षाचे चिज झाले.
वडिलांचाच 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार
ऑक्टोबर 2020 मध्ये, हरदोई येथील एक नराधम पित्याने स्वतःच्याच 4 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. एवढेच नाही तर त्याने तिच्यावर अनैसर्गिक कृत्यही केले. यामुळे मुलीच्या प्रायव्हेट पार्टला इजा झाली. ती बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.
या घटनेनंतर आरोपी वडील घरातून पसार झाले. घटना घडली त्यावेळी मुलीची आई कामावर गेली होती. भाऊ शाळेत गेला होता. काही वेळाने आई मजुरीचे काम करून घरी परतली, तेव्हा त्यांना आपल्या बेशुद्धावस्थेत आढळली.
मुलीची अवस्था पाहून धाय मोकलून रडू लागली. मुलगी शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी तिला विचारणा केली. त्यानंतर मुलीने बापाचया कृत्याचा पाढा वाचला. तेवढ्यात वडील घरी येतात. संतापाच्या भरात तिने त्याच्याशी भांडण केले. त्यावर आरोपी नवरा तिलाच मारहाण करू लागला. त्यानंतर स्वतःला एका खोलीत बंद करून घेतो.
आपल्या 4 वर्षाच्या मुलीची अशी अवस्था पाहून आई दुखावली गेली. तिने डायल 112 वर संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी वडिलांना अटक केली गेली. तसेच मुलीला मेडिकलसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर आरोपी वडिलांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. हरदोईच्या कासिमपूर पोलिस ठाणे हद्दीत ही घटना घडली.
घटनेनंतर घर - गाव सोडले
या घटनेनंतर मुलीची आई आपले घर, गाव, शहर सर्वकाही सोडून निघून गेली. ही महिला दुसऱ्या राज्यात जाऊन काम करून उदरनिर्वाह चालवत होती. ती केवळ सुनावणीसाठी कोर्टात येत असे. ज्या दिवशी न्यायालयाने महिलेच्या पतीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली, त्या दिवशी महिलेने दैनिक दिव्य मराठी नेटवर्कशी संवाद साधला.
आता 3 मुलांच्या आईने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष तिच्याच शब्दांत वाचा...
'ही घटना माझ्यासाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हती. माझ्या पतीने स्वतःच्याच मुलीसोबत असे घृणास्पद कृत्य केले होते. जिचे बोट धरून माझा नवरा तिला बाजारात घेऊन जायचा, जिला मांडीवर बसवून जेऊ घालत होता, जिच्यासाठी बाजारातून नवनवीन खेळणी आणायचा… तिच्यासोबत त्याने हे घृणास्पद कृत्य केले.
या घटनेनंतर मला नीट झोपही येत नव्हती. माझे कुटुंब माझ्यासमोर विखुरले जात होते. त्यात समाज व कुटुंबाचा दबाव. पण मी माझ्या पतीला तुरुंगात खडी फोडायला पाठवण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार 30 मे रोजी माझ्या पतीला शिक्षा झाली, तेव्हा मला खूप आनंद झाला.
10 वर्षांपूर्वी झाले होते लग्न
माझे 10 वर्षांपूर्वी लग्न झाले. तेव्हा नवरा नोकरी करायचा. लग्नानंतर खर्च वाढला, म्हणून मीही त्याच गावात मजूरी करू लागले. लग्नानंतर आम्हाला 1 मुलगी व 2 मुले अशी 3 अपत्य झाली. लग्नानंतर सर्वकाही ठीक होते. त्यामुळे माझा नवरा असे कृत्य करून संपूर्ण घर उद्ध्वस्त करेल असे कधीच वाटले नव्हते. माझ्या मुलीवरील बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यावर मला कुणीही साथ दिली नाही. सर्वांनी प्रकरण दाबण्यास सांगितले.
एकदा तर सर्वांच्या बोलण्यात येऊन मी स्वतःचाच जबाब बदलला. पण नंतर मला माझी चूक लक्षात आली. मला वाटले मी असे केले, तर माझ्या मुलीला कोण न्याय देईल. या घटनेनंतर मला माझ्या सासरच्या घरातून हाकलून देण्यात आले. मी माझा चुलता व सासरच्यांकडे मदत मागायला गेले. पण त्यांनी मला 'स्वतःचे पहा' म्हणत हाकलून दिले.
मी त्यांच्यासोबत राहिले, तर त्यांचा इज्जत जाईल
माझे सासरचे लोक मला शिवीगाळ करत होते. माझ्या निरागस मुलासाठी अपशब्द बोलत होते. त्यांनी मला घरून कपड्यांचा एक तुकडाही घेऊ दिला नाही. तेव्हा माझ्याकडे पैसेही नव्हते. मी माझ्या काका व सासरच्यांकडे गेले, तेव्हा त्यांनी मला स्वतःच्या सन्मानासाठी निघून जाण्यास सांगितले.
या सर्व गोष्टी ऐकून त्यांच्यासाठी मुलीच्या इभ्रतीचे काहीच महत्त्व नसल्याची गोष्ट माझ्या लक्षात आली. मी त्यांच्यासोबत राहिले, तर त्यांची इज्जत जाईल, असे त्यांना वाटत होते.
लोक मला टोमणे मारत
मी गावकऱ्यांकडेही मदत मागितली. पण कुणीही माझ्या पाठीशी उभे राहिले नाही. सर्वजण माझ्याकडे पाहून म्हणाले, नवऱ्याविरोधात जाताना तुला लाज वाटली नाही का. कुणीही तुझे समर्थन करणार नाही. पतीशिवाय तुला कोण ओळखते. खटला मागे घेण्यास अजून वेळ आहे. त्यांनी मला माझे तोंड पाहण्यासही नकार दिला. लोक मला टोमणे मारायचे. नीच म्हणायचे, पण मी कुणाचेच ऐकले नाही.
गावात कुणीही माझी साथ दिली नाही. माझ्या मुलांसोबत दिवसातून एकदा जेवण करून मी 1-2 दिवस गावात राहिले. त्यानंतर हातऊसने पैसे घेऊन माझ्या माहेरी आले. तेथून पेशीसाठी न्यायालयात यायचे. माझ्यासोबत माझी मुलगीही यायची.
नवऱ्याच्या डोळ्यात पश्चाताप नव्हता
सासरच्या मंडळींनी मला कोर्टाबाहेर शिवीगाळ केली. ते आमच्या मृत्यूसाठी प्रार्थना करायचे. मला माझ्या पतीच्या डोळ्यात केव्हाच पश्चाताप दिसला नाही. हे बघून मला खूप राग यायचा. माझ्या माहेरीही आमच्यासोबत काय घडले हे कळले. तिथेही मला शिवीगाळ केली जायची. त्या लोकांनी माझ्या कुटुंबातील सदस्यांना घरबाहेर पडणे अवघड करून टाकले होते. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांनीही मला तेथून जाण्यास सांगितले.
दरमहा 10-12 हजार मिळायचे
माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने मला दुसऱ्या राज्यात नोकरी मिळाली. माझ्या मुलांची तोंडे पाहून मी तिथे गेले. तिथे मला महिन्याला 10-12 हजार रुपये मिळायचे. तिथे कसातरी माझा निभाव लागला.
माझी मुलेही जवळच्या शाळेत शिकू लागली. तिथेही सगळे मला विचारतात की. तू अशी येथे का राहतेस? तुझा नवरा काय करतो, आता मी त्यांना काय सांगू की, माझ्या पतीनेच माझ्या मुलीवर बलात्कार केला, त्यामुळे मी त्याला सोडले.
महिलेच्या सासरच्यांनी घर सोडले
दुसरीकडे महिलेचे म्हणणे ऐकून दिव्य मराठीची टीम तिच्या गावी पोहोचली, तेव्हा तिचे घर रिकामे आढलले. आता तिचे सासरचे लोक दुसरीकडे राहतात. घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. आरोपीचा चुलता गावात आढळला. ते म्हणाले, पुतण्याची बायको आली होती, पण इज्जतीच्या भीतीने मी तिला घरात जागा दिली नाही.
जबाब व वैद्यकीय अहवालाच्या आधारावर शिक्षा
डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल, जबाब व एफएसएल अहवालाच्या आधारावर न्यायालयाने आरोपी पित्याला जन्मठेप ठोठावली. वैद्यकीय अहवालात मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर दुखापतीच्या खुणा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच शरीरावरही जखमेच्या खुणा आढळल्या. त्यावरून मुलीवर गैरकृत्य झाल्याचे सिद्ध झाले.
त्यानंतर आरोपी वडिलांवर स्वतःच्याच मुलीवर बलात्कार व अनैसर्गिक लैंगिक कृत्य केल्याच्या आरोपाप्रकरणी भादंवि कलम 376 एबी, 377, 506 व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून कोर्टात सुनावणी झाली. त्यात पीडित मुलगी, तिचा भाऊ, आई, काका व वहिनीने साक्ष दिली. त्यानंतर 3 वर्षांनी वडिलांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
तुम्ही हे वाचले का
व्यथा:4 वेळा बलात्कार अन् 3 वेळा गरोदर; मेहुणा बलात्कारी, भाऊ नको तिथे स्पर्श करायचा; आत्या म्हणायची - हे चालायचेच
एका 25 वर्षीय तरुणीवर तिच्याच मेहुण्याने सलग 7 वर्षे बलात्कार केला... आतेभाऊ तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करायचा. घाणेरडे बोलायचा. या 7 वर्षांत मुलगी तीनदा गरोदर झाली. पोट दुखायचे. ती वेदनानंनी ओरडायची. मग आत्या कोणतेतरी औषध द्यायची व तिला बरे वाटायचे. मुलीला नंतर समजले की, ते औषध गर्भपाताचे होते.
मुलीचे वडील तुरुंगात होते. त्यामुळे तिने वर्षानुवर्षे हे सर्व सहन केले. वडील बाहेर आल्यावर त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली. त्यानंतर 2 नोव्हेंबर 2021 रोजी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. मुलीच्या मेहुण्यालाही दीड महिना तुरुंगवास भोगावा लागला. पण त्यानंतर त्याला जामीन मिळाला. पीडितेच्या मते, भावाची अनेक वकील व राजकारण्यांशी मैत्री आहे. त्यांच्या मदतीने तो बाहेर पडला. पीडित मुलगी आजही न्यायासाठी न्यायालयात खेटे मारत आहे.
काय आहे तिची कहाणी? त्या 7 वर्षांत तिच्यावर काय-काय बेतले? हे सर्व जाणून घेण्यासाठी आम्ही पीडितेला भेटलो. चला तर मग जाणून घेऊया पीडितेची संपूर्ण कहाणी... येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.