आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनी हॉलिवूड स्टाइलने घेतला मुलीचा शोध:आरोपीने शॉपिंगचे आमिष दाखवून आरोपीने पळवून नेऊन अलिगडमध्ये ओलिस ठेवले होते

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या एका मजुराने आपल्या अपहरण झालेल्या 12 वर्षीय मुलीचा 'टेकन' या हॉलिवूडपटाच्या स्टाइलने शोध घेतला. या चित्रपटात अभिनेता लियाम नीसनने वडिलांची भूमिका केली आहे. त्याच्या मुलीचे अपहरण होते. तो तिचा शोध घेतो. वांद्रे येथे राहणाऱ्या एका मजुराने याच पद्धतीने पोलिसांच्या मदतीने आपल्या अपहृत मुलीचा शोध घेतला.

पोलिसांच्या माहितीनुसार, घटना 4 सप्टेबरची आहे. मजुराच्या 12 वर्षीय मुलीचे त्याच्याच भागात राहणाऱ्या 24 वर्षीय शाहिद खान नामक आरोपीने अपहरण केले होते. शाहिद कापड निर्मिती करणाऱ्या एका कंपनीत काम करत होता. त्याने मुलीला शॉपिंगच आमिष दाखवून पळवून नेले होते.

मुलगी कुटुंबीयांना दुसरे कारण सांगून शाहिदसोबत गेली. पण त्याने तिला शॉपिंगला नेण्याऐवजी कुर्ल्याला नेले. तिथे एका बसमधून ते प्रथम सूरत व नंतर रेल्वेने दिल्लीला गेले. मुलगी उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली.

आरोपीचे घर शोधून मुलीला शोधले

मुलीच्या वडिलांनी शेजारी व आसपासच्या लोकांकडे चौकशी केली. पण तिची कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेरीस पोलिसांच्या मदतीने त्यानी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात आरोपी शाहीद अलीगढलगतच्या अतरौली गावचा असल्याचे समजले. मुलीच्या वडिलांनी सुनियोजितपणे आरोपीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याच्या घरी पोहोचले. तिथे त्यांना मुलीला घरात लपवून ठेवण्यात आल्याचे आढळले. त्यानंतर पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने ते तिला परत घेऊन आले.

मुलीवर बलात्कारही झाला

आरोपीने पीडित मुलीवर बसमध्ये बलात्कार केला. त्यामुळे त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कलम 363 (अपहरण) अंतर्गत FIR दाखल केला आहे. पीडितेच्या जबाबानंतर यात आणखी काही कलमांची भर घातली जाईल.

बातम्या आणखी आहेत...