आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम डॉक्टरच्या 'संघ'प्रेमावर फतवा:मुरादाबादेत संघाच्या पथसंचलनावर उधळली होती फुले, कट्टरपंथियांनी मशिदीत जाण्यापासून रोखले, हत्या करणाऱ्यास 1 लाखाचे बक्षीस

मुरादाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरादाबादेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनावर पुष्पवृष्टी करणाऱ्या एका मुस्लिम डॉक्टरविरोधात फतवा जारी करण्यात आल्याची गंभीर घटना मंगळवारी उजेडात आली आहे. पीडित डॉक्टरने फतवा जारी करणाऱ्या हाफीज इम्रान वारसी याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मुरादाबादच्या महमूदपूर गावच्या डॉक्टर निजाम भारती हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी गत 2 तारखेला संघाच्या गावातील पथसंचलनावर पुष्पवृष्टी केली होती. तसेच संचलनात सहभागी स्वयंसेवकांचे हारतुऱ्यांनी स्वागतही केले होते. यामुळे नाराज झालेल्या गावातीलच हाफीज इम्रान वारसी यांनी त्यांच्याविरोधात फतवा जारी केला.

हाफीज इम्रान वारसी यांनी जारी केला फतवा.
हाफीज इम्रान वारसी यांनी जारी केला फतवा.

जीवे मारणाऱ्यास बक्षीस

पीडित भारती यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, फतव्यात त्यांना जीवे मारणाऱ्यांना व गावातून पळवून लावणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्यांच्यावर मशिदींत प्रवेश करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. निझाम यांनी फतव्याचे निवेदनात गावातील मशिदींत टाकण्यात आल्याचे स्पष्ट केले. याची तक्रार त्यांनी तत्काळ पोलिसांत केली. त्यानंतर आरोपी गुन्हा दाखल करुन आरोपी हाफीज इम्रान वारसी याला अटक केली आहे.​​​​​​​

हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला केले होते पथसंचलन.
हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला केले होते पथसंचलन.

एसएसी म्हणाले -आरोपी तुरुंगात

मुरादाबादचे एसएसपी बबलू कुमार यांनी आरएसएसच्या पथसंचलनात सहकार्य केल्याप्रकरणी निजाम यांच्याविरोधात फतवा जारी करण्यात आल्याचे स्पष्ट केले. पीडित डॉक्टर निजाम भारती यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. आता त्याला तुरुंगात पाठवण्याची कारवाई सुरु आहे, असे ते म्हणाले.

फतव्यामुळे भयभीत

डॉक्टर निजाम यांनी फतव्यामुळे आपली घाबरगुंडी उडाल्याचे स्पष्ट केले. फतव्यामुळे माझ्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. यामुळे समाजात वैमनस्यही निर्माण होईल. संघाच्या पथसंचलनावर पुष्पवृष्टी करणे हा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यावर कुणाचाही आक्षेप असता कामा नये. पण, हाफीज वारसी यांनी याविरोधात लोकांना चिथावणी देण्याचे काम केले, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...