आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fatwa Of Jamaat e Ulema Against Asaduddin Owaisi And Maulana Arshad Madani, Latest News And Update

ओवैसी-मदनीविरोधात फतवा:'जमात उलेमा ए हिंद' म्हणाली - हे दोघेही मुस्लिमांच्या नावाने स्वतःचे उखळ पांढरे करवून घेतात

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर तब्बल 12 राज्यांत दंगली उसळली. देशातील प्रमुख इस्लामिक संघटना जमात उलेमा ए हिंदने या दंगलीसाठी एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी व जमात उलेमा ए हिंदच्या दुसऱ्या गटाचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांना जबाबदार धरले आहे.

जमातचे अध्यक्ष सुहैब कासमी म्हणाले - 'असदुद्दीन ओवैसी व मौलाना मदनींविरोधात लवकरच फतवा जारी केला जाईल. या दोघांनीही दंगल घडवण्यासाठी तरुणांची माथी भडकवली.'

देशभरातील निदर्शने अजेंडा वाटतो -कासमी

कासमी पुढे म्हणाले -'ओवैसी व मौलाना मदनी यांचे तरुणांना भडकावणे हे एखाद्या अजेंड्यासारखे आहे. हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींवर कारवाई सुरू आहे. मात्र प्रयागराज ते रांचीपर्यंतच्या हिंसाचाराचे एक मॉड्यूल समोर आले आहे. ज्यांनी देश तोडण्याचा कट रचला ते या हिंसाचारात सहभागी आहेत. AIMIM खासदार ओवेसी मुस्लिमांच्या नावाने मलई खात आहेत. देशातील सध्याच्या सरकारमध्ये ओवैसींना पैसे कमावण्याचे कोणतेही साधन उरले नाही.'

कोण आहेत मौलाना अर्शद मदनी?

अर्शद मदनी हे भारतीय मुस्लिम स्कॉलर व दारुल उलूम देवबंदचे प्राचार्य आहेत. ते जमात उलेमा-ए-हिंदचे 8 वे अध्यक्षही होते. पण, 2008 च्या सुमारास संघटनेत फूट पडली. सध्या ते अर्शद गटाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

प्रयागराज हिंसाचाराच्या सूत्रधारावर कारवाई

प्रयागराज हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार जावेद उर्फ ​​पंप याचे घर रविवारी पाडण्यात आले. प्रशासनाने बुलडोझर व पोकलेनच्या मदतीने हे घर जमिनदोस्त केले. जावेदचे शहरातील गौसनगर भागात आलिशान घर होते. घर पाडण्यापूर्वी घरातील सामान काढण्याची परवानगी देण्यात आली होती. दुपारी 12.35 च्या सुमारास सुरू झालेली ही सलग 4 तास सुरू होती.

MRM ची मागणी - दंगेखोरांची इस्लाममधून हकालपट्टी करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संलग्नित मुस्लिम राष्ट्रीय मंचाने (एमआरएम) रविवारी शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला. या हिंसाचारात सहभागी झालेल्या लोकांना इस्लाममधून बहिष्कृत करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. या लोकांनी केवळ धर्माचीच नव्हे तर मुस्लिमांचीही बदनामी केल्याचा आरोप एमआरएमने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...