आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी राष्ट्राध्यक्षांनी मोदींना ठरवले चांगले मित्र:निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी एफबीआयचा बंगल्यावर छापा : ट्रम्प

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा माणूस आणि आपला सर्वात चांगला मित्र असल्याचे म्हटले आहे. वृत्तवाहिनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गुप्तचर संस्था एफबीआयचा छापा योजनेअंतर्गत टाकला होता,असा आरोप केला. ही कृती न्यायव्यवस्थेचा शस्त्र म्हणून चुकीचा वापर करण्यासारखे आहे. हा कट्टर डाव्या डेमोक्रॅट्सचा हल्ला आहे. २०२४ ची निवडणूक मी लढू नये,अशी त्यांची इच्छा आहे.

ट्रम्प म्हणाले, माझ्या कार्यकाळात अमेरिका-भारताचे संबंध सर्वात जास्त बळकट झाले. एवढे बळकट संबंध बायडेन सरकारसोबत ना ओबामा सरकारसोबत होते. अमेरिकेतही भारतीय समाजाकडून मला पाठिंबा मिळत राहिला. २०१४ ची निवडणूक लढणार का, या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले, मी निवडणूक लढवावी असे सगळ्यांना वाटते. माझी लोकप्रियता जास्त आहे. मी राष्ट्राध्यक्षपदाच्या सर्वे सर्वेक्षणांत पुढे आहे. मुलगी इव्हांकाच्या निवडणुकीबाबत त्यांनी स्पष्ट बोलण्यास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...