आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fear Of Great Danger Due To Stagnation Of Water In Rocky Outcrops By Suppressing Water Sources; Government Scientists Are Warning On Chardham Road |marathi News

भास्कर एक्सक्लुझिव्ह:जलस्रोत दबून खडकांच्या कपारींमध्ये पाणी मुरल्याने मोठ्या धोक्याची भीती; चारधाम रोडवर सरकारी शास्त्रज्ञ देत आहेत सतर्कतेचा इशारा

डेहराडून10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारधाम मार्गावरील ऑल वेदर रोडमुळे यात्रा आता सुसह्य होत असली तरी हा मार्ग तयार केला जात असताना काही चुका झाल्या आहेत. या चुकाही साध्या नाहीत. या मार्गावर आता वेळीच दुरुस्ती झाली नाही तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता कायम राहणार आहे.

उत्तराखंडचे वरिष्ठ सरकारी शास्त्रज्ञ याबाबत प्रचंड चिंतेत आहेत. वास्तविक, ऋषिकेश-बद्रीनाथ रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान अनेक ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्रोत ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. आता ते पाणी खडकांच्या कपारींत साचू लागले आहे. यामुळे खडक ओले होऊन ठिसूळ होतील व ते कोसळतील, अशी भीती आहे. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी ओव्हरहँगिंग (तीव्र उतार) असलेल्या खडकांवर आता भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी रस्त्यावर कोसळू शकतात.

उत्तराखंड स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रा. एमपीएस बिश्त यांनी सांगितले की काही काळापूर्वी धोक्याचे क्षेत्र चिन्हांकित केले होते. परंतु, रस्ता रुंदीकरणासाठी खडक फोडण्यात आल्याने त्यांना भेगा पडल्या आहेत. ते कोसळू शकतात. चारधाम यात्रा सुरू करण्यापूर्वी हे खडक पाडायला हवे होते. ऋषिकेश-बद्रीनाथ मार्गावरील तोता घाटी, पाताळगंगा, विष्णुप्रयाग, बलदौडत्रा, लामबगड, हनुमान चट्टी आदी ठिकाणी असे खडक स्पष्टपणे दिसतात.

हिमालय पर्वतरांगांत दररोज १०-२० छोटे भूकंप होतात. हे रिश्टर स्केलवर ३ पेक्षा कमी असल्याने जाणवत नाहीत. परंतु, त्यामुळे जमिनीवर कंपने होतात व खडक कोसळत राहतात. प्रा. बिश्त म्हणाले, ‘आमच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की या भागातील ऑल वेदर रोडच्या कामात काही चुका झाल्या आहेत. खडकांमध्ये पडलेल्या भेगांमुळे खडक केव्हाही खाली कोसळू शकतात हे स्पष्टपणे दिसत असून हे केव्हा पण मोठ्या अपघाताचे कारण होऊ शकते.’

रस्ता तयार करताना गाडले गेले स्रोत
प्रा. बिश्त यांनी सांगितले की, या मार्गावर अनेक ठिकाणे अशी आहेत जिथे वरच्या उतारावर पाण्याचे अनेक छोटे स्रोत आहेत. रस्ता तयार करताना हे स्रोत ढिगाऱ्यात गाडले गेले. त्यातून वर्षभर पाणी येते. काही ठिकाणी तर उताराच्या खाली रस्त्यावर ढाबे आदी उघडण्यात आले असून, तेथे प्रवाशांची वर्दळ असते. प्रत्यक्षात जलस्रोतांचा मार्ग गाडला गेला आहे. आता हे पाणी खडकांमध्ये साचू लागले आहे. अशा स्थितीत महाकाय खडक ओले होऊन कमकुवत होतात व एक मोठा धोका बनतात.

शास्त्रज्ञांनी उत्तराखंड सरकारला केल्या तीन सूचना
अशा सर्व भागांना ताबडतोब चिन्हांकित करा, तेथे इशारा देणारे फलक लावा.
उतारावरून येणाऱ्या पाण्याच्या धारांना मार्ग द्या, म्हणजे धोका टळेल.
ज्या खडकांवर भेगा दिसत आहेत, त्यांना वेळीच पाडून टाका.

बातम्या आणखी आहेत...