आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Fear Of India's Action | Pakistan Air Force Jets Increased Patrols After Handwara Terror Attack

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताच्या कारवाईची भीती:हंडवाडा चकमकीनंतर पाकिस्तानने आपल्या सीमेवर एफ -16 आणि जेएफ -17 लढाऊ विमानांसह गस्त वाढविली

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • पाकिस्तानला वाटते की, भारत बालाकोट आणि सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे प्रत्युत्तरात्मक कारवाई करेल

हंडवारा (काश्मीर) दहशतवादी चकमकीनंतर भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या भीतीने पाकिस्तानी हवाई दलाने सीमेवर सुरक्षा वाढवली आहे. एका उच्च सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी लष्कराचे एफ -16 आणि जेएफ 17 लढाऊ विमान सतत गस्त घालत आहेत. भारतीय लष्कर आपल्या सर्व्हिलान्स सिस्टमद्वारे यावर नजर ठेवून आहे. 2 मे रोजी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह 5 सैनिक शहीद झाले होते. 

एअर आणि सर्जिकल स्ट्राइकमुळे पाकिस्तानच्या मनात भीती 

सूत्रांनुसार, पाकिस्तानकडून गस्त वाढवल्याचा अर्थ लावला जात आहे की, हंडवाडा चकमकी आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांनंतर भारताच्या वतीने मोठी कारवाई केली जाऊ शकते. असे पाकिस्तान गृहीत धरत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत उरी आणि पुलमवा हल्ल्यासारख्या दहशतवादी हल्ल्यानंतर पीओकेमध्ये भारताने मोठी कारवाई केली आहे. पुलमवा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या बालाकोट येथील छावणीला लक्ष्य केले. उरी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या लाँचिंग पॅडवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते. 

हंडवाडा चकमकीत कर्नल आशुतोष यांच्यासह 5 जवान शहीद झाले होते

हंदवाडा येथे 2 मे रोजी रात्री झालेल्या चकमकीत सैन्याच्या 21 राष्ट्रीय रायफल्स (आरआर) चे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह 5 जवान शहीद झाले होते. या चकमकी दरम्यान सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार केले. यांपैकी एक लष्कर-ए-तैयबाचा मुख्य कमांडर हैदर होता. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने उत्तर काश्मीरमधील एका घरावर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी घरातील लोकांना बंदी बनवले होते, सैन्य आणि पोलिसांचे दल त्यांना वाचवण्यासाठी गेले होते. या लोकांना सुरक्षा दलाने वाचवले.

यावर्षी आतापर्यंत 62 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे

यावर्षी जानेवारीपासून जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या चकमकीत 62 हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. लॉकडाऊन दरम्यान दहशतवाद्यांकडून सीमेपलीकडून सतत घुसखोरीचे प्रयत्न होत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...