आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fear Of Vaccines Here ... 40% Of Children Vaccinated At Antatna AIIMS Are Doctors; News And Live Updates

कोरोना फ्रंटलाइन वॉरियर्स:इकडे लसीची भीती वाटते... अन् पाटणा एम्समध्ये मुलांच्या लसीच्या चाचणीत 40% मुले डॉक्टरांचीच

पाटणा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जोखमीच्या प्रश्नावर डॉक्टर म्हणतात, जोखीम असली तरी हे आवश्यक

मुलांसाठीची लस ही कल्पनाच श्वासात नवी ऊर्जा.. नवा विश्वास निर्माण करणारी आहे. मागील आठवड्यापासून दिल्ली, पाटणा आणि नागपुरात या लसीची मुलांवर चाचणी घेतली जात आहे. पाटणा एम्समध्ये १२ ते १८ वर्षांपर्यंतच्या २७ मुलांवर चाचणी केली जात आहे. यातील ४० टक्के मुले डॉक्टरांची आहेत. स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. कल्पना यांनी आपल्या तीन मुलांवर लसीची चाचणी करून घेतली. मागील वर्षी स्वत: लसीच्या चाचणीत सहभागी होत्या.

एम्सच्या ‘बर्न एंड प्लास्टिक सर्जरी’ विभागाच्या प्रमुख डाॅ. वीणा यांनी आपल्या १३ वर्षीय मुलाला चाचणीत सहभागी केले. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत त्या आपल्या ७ वर्षीय मुलाला सहभागी करतील. त्यासाठी लवकरच स्क्रीनिंग होईल. डाॅ. वीणा यांनी मागील वर्षी स्वत:वर काेव्हॅक्सिनची चाचणी केली होती. एम्सच्या सहायक प्राेफेसर डाॅ. मीनाक्षी तिवारी यांनीही १४ वर्षीय मुलीला चाचणीत सहभागी केले.

जोखमीच्या प्रश्नावर डॉक्टर म्हणतात, जोखीम असली तरी हे आवश्यक

1. या चाचणीत जोखीम नाही?
उत्तर: आम्हाला जोखीम माहिती आहे, परंतु आम्ही शक्यताही जाणतो. क्लिनिकल ट्रायलपूर्वी लस एवढ्या टप्प्यातून जाते की यात जोखीम आपोआप कमी होते.

2. चाचण्यांनंतरही भीती कायम का?
उत्तर: कोण घाबरते? ज्यांना लसीबद्दल फार माहिती नाही, असेच घाबरतात किंवा आपल्या स्वार्थासाठी काही लोक मुद्दाम याबद्दल मनात भीती निर्माण करतात.

पाटणा एम्समध्ये पहिल्या टप्प्यात मुलांवरील लसीची चाचणी पूर्ण
तिसऱ्या टप्प्यात चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ५६ दिवसांनी लस बाजारात येण्याची शक्यता आहे. पाटणा एम्समध्ये मुलांवर कोव्हॅक्सिनची चाचणी घेतली जात आहे. १२ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना पहिल्या डोसची चाचणी घेतली गेली. त्यांना आता २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. एम्समध्ये दुसऱ्या टप्प्यात ६ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांवरील चाचणीसाठी स्क्रीनिंग सुरू आहे.

एम्सचे ५ डॉक्टरही या टप्प्यात आपल्या मुलांचे स्क्रीनिंग करणार आहेत. २५ मुलांवर आठवडाभरात चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर २ ते ६ वर्षे गटातील मुलांवर चाचणी केली जाणार आहे. याकरिता एक आठवडा लागू शकतो. एम्सचे एमएस डाॅ. सी.एम. सिंह यांनी सांगितले की, तिसऱ्या टप्प्यात चाचणी पूर्ण झाल्यानंतर ५६ दिवसांनी अँटिबाॅडी तपासल्या जातील. त्या मानकानुसार असतील तर अहवाल ड्रग कंट्राेलर जनरल अाॅफ इंडियाला पाठवला जाईल.

बातम्या आणखी आहेत...