आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fearing That Idolatry Of Gods And Goddesses Will Bring Disaster, The Villagers Are Made Christians

दिव्‍य मराठी ग्राउंड रिपोर्ट:देवी-देवतांच्या मूर्तिपूजेतून अनर्थ होतो अशी भीती दाखवून ग्रामस्थांना बनवताहेत ख्रिश्चन

हर्ष खटाना | जयपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजधानीमध्ये सरकारच्या नाकावर टिच्चून मोठा खेळ सुरू आहे. जयपूरपासून २२ किमीवरील वाटिका हे गाव याचे केंद्र आहे. ४०० कुटुंबे असलेल्या या गावात व आसपासच्या गावांमध्ये दिव्‍य मराठी टीम पोहोचली असता इथे हिंदूंचे धर्मांतर सुरू असल्याचे दिसून आले.

गरीब आणि अनुसूचित जातींच्या ग्रामस्थांना भीती दाखवून ख्रिश्चन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, स्वत:ला मिशनरी ग्रुप असल्याचे सांगणारे लोक मूर्तिपूजा बंद करा, हिंदू देवी-देवतांना मानू नका आणि व्रतवैकल्ये टाळा, असा ते संदेश देत आहेत. येशूच्या आश्रयाला आल्यास प्रत्येक समस्या दूर होत असल्याचा दावा ते करत आहेत. मिशनरीच्या संपर्कात येऊन ख्रिश्चन धर्मप्रचारक झालेले पास्टर धर्मपाल बैरवा आणि त्यांची टीम या भागात धर्माच्या प्रचाराचे कार्य करत आहे.

मूर्ती विहिरीत किंवा तलावात फेका, नैवेद्य देऊ नका : गावातील रेखा आणि लालाराम म्हणाले, या कार्यातील एका ग्रुपने गावातील अनेक लोकांना प्रेरित केले. येशूंच्या प्रार्थनेनंतर मूर्तिपूजेपासून दूर राहा, असे लोकांना सांगण्यात आले. मूर्ती विहिरीत किंवा तलावात फेकून या किंवा पिंपळावर सोडून या. देवाला नैवेद्य देणे बंद करा, असेही म्हणाले.

सांगानेरमध्ये कार्यक्रमासाठी लावण्यात आले पोस्टर ^मी आधी ठेकेदारी करत होतो. येशूवर विश्वास आहे. त्यामुळेच प्रार्थनेचे आयोजन करत होतो. विरोध होताच ते स्थगित केले. एकेकाळी मी आजारी होतो तेव्हा सर्व देवी-देवतांची पूजा केली. मात्र, फायदा झाला नाही. मग येशूच्या आश्रयाला गेलो आणि आराम मिळाला. आता इतरांनाही प्रेरित करतो. - पास्टर धर्मपाल बैरवा, कार्यक्रमाचे आयोजक

फाईल फोटो

बातम्या आणखी आहेत...