आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मथुरेत वृद्ध महिलेची साखळी लुटली:दुचाकीवरुन आले होते चोरटे, महिलेला खाली ढकलून दिले व त्यानंतर चेन लुटली

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैन स्नॅचर्सचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. मथुरेतील गोविंदनगर भागात दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुचाकी चालवणाऱ्या एका चोरट्याने हेल्मेट घातले होते. तर त्याचा दुसरा साथीदार महिलेच्या मागे चालताना दिसत आहे. कॅमेऱ्यात त्याचा चेहरा स्पष्ट दिसून येतोय. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांना पकडणारअसल्याचा दावा पोलिस करत आहेत.

या घटनेनंतर पोलिस गंगादेवीकडे तिच्या घरी चौकशी करण्यासाठी पोहोचले.
या घटनेनंतर पोलिस गंगादेवीकडे तिच्या घरी चौकशी करण्यासाठी पोहोचले.

ज्या ठिकाणी ही घटना घडली. ते ठिकाण श्री कृष्ण जन्मस्थानच्या गोविंद नगर गेटपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर आहे. हे ठिकाण एलो झोनमध्ये येते. श्री कृष्णजन्मभूमीच्या गोविंद नगर गेटजवळ प्राचीन गकटेश्वर महादेव मंदिर आहे. येथे 80 वर्षीय वृद्ध महिला गंगा देवी सिंघल दर्शनासाठी जात होत्या.

सीसीटीव्हीमध्ये दिसते की, त्यांच्या शेजारी एक दुचाकीस्वार बदमाश पुढे जातो, नंतर दुचाकी मागे वळवतो. तर एक मुलगा वृद्ध महिलेच्या मागे येताना दिसतो. तेवढ्यात तो महिलेची साखळी ओढतो. यावेळी तो महिलेला खाली ढकलून देतो. त्यानंतर तो दुचाकीवर बसून फरार होतो. दरम्यान खाली माती असल्यामुळे महिलेला दुखापत झाली नाही.

गंगा देवी यांनी सांगितले की, तिने त्या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याने तिला ढकलले.
गंगा देवी यांनी सांगितले की, तिने त्या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याने तिला ढकलले.

पोलिस करत आहेत तपास
वृद्ध महिला गंगादेवी यांच्या गळ्यातील साडे 17 ग्रॅम सोन्याची चेन चोरट्यांनी हिसकावून नेली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस स्टेशन प्रभारी संजय पांडे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितेकडून घटनेची माहिती घेतली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलेल्या चोरट्यांची माहिती तपासण्यात येत असल्याचे स्टेशन प्रभारींनी सांगितले. लवकरच चोरट्यांना अटक केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

चोरट्याशी 'ती' एकटीच भिडली

जयपूर येथे चोराने एका महिलेचा मोबाइल हिसकण्याचा प्रयत्न केला. मात्र, या महिलेने न भिता धाडसाने या चोराचा सामना केला आहे. यामुळे मोबाईल चोरणे राहिल दूरच पण चोरांना सपशेल शरणागती पत्करण्याची वेळ आली. ही संपूर्ण घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. या महिलेचे चहुकडून कौतुक होते आहे. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...