आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Festivals In Corona Crisis : Corona Changed Travelling Trend; How Will The Country Travel This Time? Only 10% Train, Air Travel 5 Times More Expensive During Festivals

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाकाळात सण:देश या वेळी कशा प्रकारे प्रवास करेल? सणांत केवळ 10% रेल्वे, विमान प्रवास 5 पट महाग

शरद पांडेय | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाने बदलला ट्रॅव्हलिंग ट्रेंड : दिवाळीच्या काळातही तेजसमध्ये जागा रिक्त, विमानाला प्रवाशांची पहिली पसंती

कोरोना काळात या वेळी सणासुदीतही केवळ १० टक्के रेल्वे धावत आहेत. रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनुसार सामान्य दिवसांत लोकल, पॅसेंजर, मेल, एक्स्प्रेस, राजधानी, शताब्दी, दुरंतो मिळून सुमारे १३ हजार गाड्या चालायच्या. सध्या फक्त १३०८ रेल्वे धावताहेत. रेल्वे मंडळाचे एडीजी जे. डी. नारायण यांनी “भास्कर’ला सांगितले की, गरजेनुसार रेल्वे रोज गाड्यांचा आढावा घेत आहे. दिवाळी आणि छठसाठी सोमवारी जादा गाड्यांची घोषणा होऊ शकते. प्रवासासाठी पुरेशा प्रमाणात रेल्वे उपलब्ध होतील. रेल्वेने फिजिकल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन प्रतीक्षा यादीतील तिकिटांवर प्रवासाची परवानगी दिलेली नाही. यामुळे रेल्वे विविध मार्गांवर ४० क्लोन रेल्वेगाड्या चालवत असल्याने प्रतीक्षा यादी मोठी नाही.

दुसरीकडे विमानाचे भाडे सामान्याच्या तुलनेत पाचपटीपर्यंत वाढले आहे. मात्र, सरकारने भाड्यावर कॅपिंग लावली आहे. यामुळे अंतरानुसार ७ गटांत भाडे निश्चित करण्यात आले आहे. विमान कंपन्यांना ४० टक्के आसने सरासरी भाड्याच्या कमी दराने विकायची असतात. उर्वरित ६० टक्के आसनांचे भाडे ठरावीक सर्वोच्च सीमेपर्यंत वाढले आहे. ज्या हवाई मार्गावर जास्त भाडे वाढले, त्यात सर्वाधिक दिल्ली-वाराणसीचे आहे. जे पाचपट आहे. दिल्ली ते पाटणा आणि दिल्ली ते लखनऊचे भाडे चारपट जास्त झाले आहे. मेकमाय ट्रिपचे सीओअो विपुल प्रकाश सांगतात की, दिवाळीमुळे ६ ते १६ नोव्हेंबरदरम्यान रेल्वे आणि विमान बुकिंग २० टक्के वाढली आहे. दिल्ली, पाटणा, कोलकातासाठी जास्त बुकिंग होत आहे.

कोरोनाने बदलला ट्रॅव्हलिंग ट्रेंड : दिवाळीच्या काळातही तेजसमध्ये जागा रिक्त, विमानाला प्रवाशांची पहिली पसंती

गेल्या वेळी तेजसचे भाडे विमानापेक्षा दीडपट जास्त होते

> लोक रेल्वेऐवजी विमानाने प्रवास करणे पसंत करत आहेत. यामुळेच दिवाळीच्या आसपास तेजसमध्ये (दिल्ली ते लखनऊ) आसने आहेत आणि डायनामिक भाडे केवळ ३१५ रुपये आहे. तर विमानाचे भाडे तेजसपेक्षा जवळपास पाचपट जास्त आहे. गेल्या दिवाळीत तेजसचे भाडे विमानापेक्षा दीडपट जास्त होते.

या वेळी दिवाळी आणि छठच्या आसपास 21 लाख जण प्रवास करतील

> प्रत्येक रेल्वेत सरासरी १५०० प्रवाशांच्या हिशेबाने रोज १९ लाख जण रेल्वेने प्रवास करण्याची आशा आहे.

> सामान्य स्थितीत दिवाळीच्या तीन-चार दिवस आधीपर्यंत रोज २.८० कोटी प्रवासी रेल्वेत असायचे.

> या वेळी ही संख्या 2 लाख पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे .

> 3.25 लाख विमानाने सामान्य दिवसांत आणि दिवाळीच्या आसपास ३.५० लाखांपर्यंत संख्या जात असे मागील वर्षी.