आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर:विश्वविजेत्या अर्जेंटिनाचा 49व्या क्रमांकावरील सौदी अरेबियाकडून 2-1ने धक्कादायक पराभव

स्पोर्ट्स डेस्क9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिफा विश्वचषकात मंगळवारी मोठा उलटफेर पहावयास मिळाला. त्यात विश्वचषकाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाचा 49 व्या क्रमांकावर असणाऱ्या सौदी अरेबियाने 2-1 असा धक्कादायक पराभव केला. या पराभवामुळे अर्जेंटिना ग्रुप-सी मध्ये शेवटच्या क्रमांकावर फेकल्या गेला आहे.

सौदी अरेबियाने दुसऱ्या हाफमध्ये आक्रमक खेळ करत 2 गोल केले. पहिला गोल सामन्याच्या 48 व्या मिनिटाला अल-शाहरानीलने डागला. त्यानंतर अवघ्या 5 मिनिटांत म्हणजे 53 व्या मिनिटाला सलेम अल-दावसारीने दुसरा गोल केला. अर्जेंटिनाच्या लियोनल मेसीने 10 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला होता. त्यानंतर त्याच्या संघाला एकही गोल करता आला नाही.

या पराभवामुळे अर्जेंटिनाचा सलग 36 सामन्यांत विजयी होण्याची मालिका खंडीत झाली आहे. अर्जेंटिनाचे आतापर्यंत खेळण्यात आलेल्या 36 सामन्यांपैकी 25 सामन्यांत विजय मिळवला होता. तर 11 सामने ड्रॉ झाले होते. आता 27 नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनाचा सामना मेक्सिकोशी होईल. तर त्यानंतर 30 डिसेंबर रोजी तो पोलंडशी दोनहात करेल. सौदी अरेबियाचा विश्वचषकातील हा अवघा तिसरा विजय आहे.

खालील फोटोंमध्ये पाहा सौदी अरेबियाच्या पहिल्या गोलचा थरार...

48 व्या मिनिटाला सौदी अरेबियाच्या अल-शाहरानीने गोल पोस्टच्या दिशेने शॉट मारला.
48 व्या मिनिटाला सौदी अरेबियाच्या अल-शाहरानीने गोल पोस्टच्या दिशेने शॉट मारला.
गोल केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना सौदी अरेबियाचे खेळाडू.
गोल केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना सौदी अरेबियाचे खेळाडू.
सौदीचा खेळाडू गोल करण्यासाठी आक्रमक शॉट खेळताना.
सौदीचा खेळाडू गोल करण्यासाठी आक्रमक शॉट खेळताना.
अर्जेंटिनाच्या गोलकीपरला फुटबॉल गोलमध्ये जाण्यापासून रोखता आला नाही.
अर्जेंटिनाच्या गोलकीपरला फुटबॉल गोलमध्ये जाण्यापासून रोखता आला नाही.
गोल केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणारे सौदी अरेबियाचे खेळाडू.
गोल केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणारे सौदी अरेबियाचे खेळाडू.
सौदी अरेबियाच्या अल-दावसारीने 53 व्या मिनिटाला गोल करून बॅकफ्लिप करत सेलिब्रेट केले.
सौदी अरेबियाच्या अल-दावसारीने 53 व्या मिनिटाला गोल करून बॅकफ्लिप करत सेलिब्रेट केले.

अर्जेंटिनाला नॉकआउटमध्य पोहोचण्यासाठी काय करावे लागेल?

सौदी अरेबियाकडून मानहाणीकारक पराभव झाल्यानंतर अर्जेंटिनाचे आता केवळ 2 सामने शिल्लक राहिलेत. राउंड ऑप 16 मध्ये जाण्यासाठी त्याला हे दोन्ही सामने कोणत्याही स्थितीत जिंकावे लागतील.

अर्जेंटिना ऑफसाइडमध्ये अडकला

अर्जेंटिनाने सुरुवातीला चांगला खेळ केला. पण संघाच्या खेळाडूंनी तब्पल 7 वेळा ऑफसाइड केले. अर्जेंटिनाच्या लोटारो मार्टिनेजने दुसरा गोल जवळपास केला होता. पण पंचांनी ऑफसाइडमुळे तो रद्दबातल ठरवला. मेसीचाही एक गोल ऑफसाइड झाला.

सौदी अरेबियाचा गोलकीपर एम अल ओवैश अर्जेंटिनाचा गोल रोखताना.
सौदी अरेबियाचा गोलकीपर एम अल ओवैश अर्जेंटिनाचा गोल रोखताना.
मेसीने अर्जेंटिनासाठी एकमेव गोल केला. पण त्याचा संघाला कोणताही फायदा झाला नाही.
मेसीने अर्जेंटिनासाठी एकमेव गोल केला. पण त्याचा संघाला कोणताही फायदा झाला नाही.

अर्जेंटिना-सौदी अरेबियाचे स्टार्टिंग इलेव्हन

सौदी अरेबिया (4-4-1-1): मोहम्मद अल-ओवेस (गोलकीपर) ,सऊद अब्दुलहामिद, हसन अल-तम्बाकती, अली अल-बुलायही, यासर अल-शाहरानी, मोहम्मद कन्नो, अब्दुलल्लाह अल-मल्की, सलमान अल-फराज (कर्णधार), सलेम अल-दावसारी, फिरास अल-ब्रिकन, सालेह अल-शेहरी.

अर्जेंटीना (4-2-3-1): एमिलियानो मार्टिनेज (गोलकीपर), नहुएल मोलिना, क्रिस्चन रोमेरो, निकोलस ओटामेंडी, निकोलस टैगेलियाफिको, रोड्रिगो डी पॉल, लिएंड्रो परेडेस, एलेजांद्रो गोमेज, लियोनल मेसी (कर्णधार), लौटारो मार्टिनेज, एंजल डी मारिया.

बातम्या आणखी आहेत...