आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलन (हिमाचल प्रदेश)| हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात सोमवारी तांत्रिक बिघाडामुळे टिंबर ट्रेल रोपवेमध्ये (केबल कार) १५ पर्यटक जवळपास ३ तास अडकून पडले. परवनू भागातील या केबल कारमध्ये अडकलेल्या पर्यटकांना ट्रॉलीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती हिमाचलच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव ओंकारचंद शर्मा यांनी दिली. त्याआधी हवाई दलाच्या पथकालाही बचावासाठी अलर्ट करण्यात आले होते.बचाव कार्यादरम्यान सिमला-चंदीगड महामार्गावरील वाहतूक रोखल्याने वाहतूक कोंडी झाली.
हॉटेलमध्ये जाण्या-येण्यासाठी केबल कारचा वापर
परवानूजवळील केबल कारपासून ८०० मीटर अंतरावर एका टेकडीवर एक हॉटेल आहे. या हॉटेलपर्यंत जाण्या-येण्यासाठी लोक केबल कारचा वापर करतात. या हॉटेलमधून लोक परतत असताना केबल कारमध्ये बिघाड झाला.
३० वर्षांपूर्वीही अशी दुर्घटना
कालका-सिमला महामार्गावर असलेल्या टिंबर ट्रेलमध्ये १३ ऑक्टोबर १९९२ रोजी ११ पर्यटक अडकले होते. यादरम्यान ट्रॉली अटेंडंट गुलाम हुसेन यांनी जीव वाचवण्यासाठी उडी मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.