आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Fifteen year old Boy On A Bullock Cart After Selling 15,000 Bulls For 5,000 Rupees

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य प्रदेश:अर्ध्या रस्त्यात पैसे संपल्याने 15 हजारांचा बैल 5 हजारांत विकून पंधरा वर्षांच्या मुलाला बैलगाडीला जुंपले

इंदूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • 40 अंश तापमानात एका बैलासोबत जुंपलेला मुलगा कुटुंबाला घेऊन निघाला

दीपेश शर्मा  

देशभरात लाॅकडाऊनमुळे कामधंदा गमावलेले मजूर आणि इतर लाेक आपल्या घरी परतताहेत. ५० दिवसांच्या लाॅकडाऊनने गरीब मजुरांचे जगणे मुश्कील केले आहे. सरकारचे दावे काहीही असोत, वस्तुस्थिती भयानक आहे. मजुरांची अनेक प्रकारची छायाचित्रे चर्चेत असली तरी ही छायाचित्रे बघून कोणाचाही आत्मा कापेल. हे दृष्य मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदूर बायपास रस्त्यावर बघायला मिळाले. मेंढपाळाच्या कुटुंबावर अशी वेळ आली की गावात परत येत असताना रस्त्यातच एक बैल अर्ध्या किमतीत विकावा लागला. दुसऱ्या बैलासोबत बैलगाडी ओढण्यासाठी १५ वर्षांचा मुलगा मनोज स्वत: बैलासारखा जुंपला. हे कुटुंब मध्य प्रदेशातील जुलवानियाहून सुमारे २०० किलोमीटर लांब देवासकडे निघाले आहे. मनोजने सांगितले, आमच्या पाच जणांच्या कुटुंबात दोन बहिणी, भावजी आणि वडील आहेत. एक बहीण गरोदर आहे.

आम्ही जुलवानिया जवळून देवास करता पायी निघालो होतो. प्रवासात खाण्या-पिण्याचे साहित्य आणि पैसे संपले. समस्या वाढत चालली होती. प्रवास अर्धाच झाला हाेता. यामुळे सर्वांनी ठरवले की एक बैल विकल्यास काही दिवसांचा खर्च निघेल. त्यानंतर जे काही होईल ते बघू. त्यांचा प्रवास अजून अर्धा बाकी आहे, म्हणजे सुमारे १०० किलोमीटर आणखी चालायचे आहे. अशात ४० अंशांचे ऊन आणि तापलेल्या रस्त्यावर मनोजच्या खांद्यावरील हे ओझे मजूर आणि गरजूंची स्थिती दर्शवत आहे. कोरोनामुळे अशा हजारो लोकांना घरी परतावे लागत आहे, जे वर्षानुवर्षे शहरे, राज्यांमध्ये आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आले होते.

एकट्या बैलावर जास्त भार, म्हणून स्वत:ला जुंपले

मनोज सांगतो, कामधंदा नसल्याने पैसे नव्हते. बैलांना खाऊ घालायचे की स्वत:ला. म्हणून पिथमपूर जवळ एका शेतकऱ्याला बैल ५ हजारांत विकावा लागला. बैलाची किंमत १५ हजार होती, मात्र आमच्या असहायतेचा फायदा घेत केवळ ५ हजार रुपये दिले. यातून काही दिवस तरी निघतील. अजून बराच पल्ला गाठायचा अाहे. एका बैलावर भार नको म्हणून मी स्वत: त्याच्यासोबत जुंपून घेतले.

बातम्या आणखी आहेत...