आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृपक्ष:गयेत बारा दिवसांत पावणेतीन लाख भाविकांनी केले श्राद्ध, पितृपक्षाचा मेळा नसतानाही भाविकांचा ओघ सुरू

गया / दीपककुमार21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पितृपक्षाचा समारोप बुधवारी होणार आहे. परंतु त्याआधी गयेत पिंडदानासाठी भाविकांचा ओघ सुरू आहे. यंदाही बिहार सरकार व जिल्हा प्रशासनाने गयेत पितृपक्ष मेळ्याच्या आयोजनास परवानगी दिलेली नव्हती. केवळ श्राद्ध करण्यास मंजुरी होती. मेळा नसल्यामुळे प्रशासकीय पातळीवर काहीही व्यवस्था नाही. त्यामुळे भक्तांची व्यवस्था करणारी संस्था विष्णुपद व्यवस्थापन समितीचे सचिव गजाधरलाल पाठक म्हणाले, गेल्या १२ दिवसांत विविध राज्यांत पावणेतीन लाखांहून जास्त भाविक बिहारच्या गयाधाममध्ये दाखल झाले आहेत. ही संख्या कोरोनापूर्वीच्या तुलनेत निम्मी आहे. २०१९ मध्ये सुमारे ७ लाखांवर भाविकांनी हजेरी लावली होती. मध्य प्रदेश, हरियाणा, झारखंड, बिहार, दिल्लीतील पिंडदान करणाऱ्यांची संख्या येथे सर्वाधिक आढळून आली आहे.

१८०५ मध्ये एक लाख लोक
गया अनेक धर्मांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. हिंदू समुदायासाठी पूर्वजांच्या मुक्तीचे, बाैद्ध धर्मीयांसाठी ज्ञानाचे केंद्र मानले जाते. शीख-मुस्लिमांसाठीदेखील हे श्रद्धेचे ठिकाण आहे. १८०५ मध्ये येथे एक लाखावर लाेकांनी भेट दिली हाेती. १९०५ मध्ये तीन लाख लाेक दाखल झाले होते. दरवर्षी येथे गर्दी दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...