आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Fight Against Corona : Vaccines Give Hope ..! Two Gospels Simultaneously Against The Global Epidemic

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाविरुद्ध लढा:लसीने आशा पल्लवित..! जागतिक स्तरावर महामारीविरुद्ध एकाच वेळी दोन सुवार्ता

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे | सीरम इन्स्टिट्यूटमध्ये पंतप्रधान. - Divya Marathi
पुणे | सीरम इन्स्टिट्यूटमध्ये पंतप्रधान.
  • भारत सरकारने नागरिकांसाठी केली 160 कोटी डोसची व्यवस्था - दावा
  • R नंबर : एकाचा दुसऱ्याला संसर्गाचा दर आता निम्म्यावर

कोरोनाविरुद्धच्या आघाडीवर शनिवारचा दिवस विशेष ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद, हैदराबाद, पुण्यातील ३ औषधनिर्मिती केंद्रांना भेटी दिल्या. येथे देशातील ३ मोठ्या कंपन्या कोरोना लसीच्या विकास व उत्पादनासाठी झटत आहेत. मोदींनी तेथील या प्रक्रियांचा आढावा घेतला. यामुळे देशाला लवकरच कोरोना लस मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन’ या देशातील दिग्गज संस्थेच्या दाव्यानेही लसीच्या आशा वाढल्या आहेत. संस्थेने ड्यूक ग्लोबल हेल्थ इनोव्हेशन सेंटरच्या अहवालाच्या हवाल्याने सांगितले की, भारत सरकारने आतापर्यंत नागरिकांसाठी लसीच्या १६० कोटी डोसच्या खरेदीची व्यवस्था केली आहे. अमेरिकेनेही त्यांच्या नागरिकांसाठी इतकेच डोस जमवले आहेत. २७ देशांच्या युरोपियन युनियनने ५४० कोटी डोसची तयारी केली आहे.

मोदी यांनी भेट दिलेल्या लसीची सद्य:स्थिती

1. कोविशील्ड, सीरम इन्स्टिट्यूट, पुणे : जगात सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. सुमारे ७० ते ९० % पर्यंत प्रभावी. सीरम इंडिया त्याची निर्मिती करत आहे. ती सर्वात अाधी भारतीयांना, नंतर इतर देशांना मिळेल. जुलै २०२१ पर्यंत ४० कोटी डोस तयार होतील.

2. कोव्हॅक्सिन,भारत बायोटेक, हैदराबाद : तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. लस ६०% पर्यंत प्रभावी ठरली आहे. कंपनीच्या अांतरराष्ट्रीय कार्यकारी संचालक साईप्रसाद यांच्यानुसार, ‘२०२१ च्या दुसऱ्यात तिमाहीत लस लाँच करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’

3. झायकोव-डी, झायडस कॅडिला, अहमदाबाद : पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. कंपनीचे चेअरमन पंकज पटेल म्हणाले, मार्च २०२१ पर्यंत चाचण्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आम्ही दरवर्षी १० कोटी डाेस निर्मितीचे ध्येय ठेवले आहे.

दिल्ली : लस येताच महिन्यात सर्वांना मिळेल

देशात कोरोना लसीकरणाची सज्जता सुरू असताना दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले, ‘आमचीही तयारी चांगलीच आहे. कोरोनावरील लस उपलब्ध होताच प्रत्येक दिल्लीकराला ३-४ आठवड्यांत ती टोचली जाईल.’

लॅक्झेंबर्गच्या कंपनीला वाहतुकीचे कंत्राट

देशाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत लसीच्या वाहतुकीचे कंत्राट लॅक्झेंबर्गच्या बी मेडिकल सिस्टिम्स कंपनीला मिळू शकते. कंपनी पुढील आठवड्यात एक टीम गुजरातेत पाठवत आहे. तेथे कंपनीचे केंद्र तयार होऊ शकते.

R नंबर : एकाचा दुसऱ्याला संसर्गाचा दर आता निम्म्यावर

आधी १ रुग्ण २.५ लोकांना बाधित करायचा, आता १.२५ जणांना होतो संसर्ग

देशात कोरोना संसर्गाचा वेग घटला आहे. दोन महिन्यांपूर्वीच्या तुलनेत तो जवळपास ५० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. हे समजवण्यासाठी तज्ज्ञांनी एक नवी टर्म ‘आर नंबर’चा वापर केला आहे. आर नंबर म्हणजे कोरोना व्हायरसचा रि-प्रोडक्टिव्हिटी रेट (पुनर्प्रजनन दर).

इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) डॉ. समीरन पांडा यांच्यानुसार, हा ‘आर नंबर’ गेल्या २ महिन्यांच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. आधी हा दर २.५ होता. आता तो १.२५ ते १.५ दरम्यान आहे. त्याचा स्पष्ट अर्थ असा - आधी एक कोरोनाबाधितापासून अडीच जणांना लागण होत होती. आता सव्वा किंवा दीड लोकांना संसर्ग होतो.

राष्ट्रीय कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. नरेंद्र अरोरा म्हणाले, व्हायरसचा ‘आर नंबर’ एकच्या खाली गेला अन् तो वेग कायम राहिला तर व्हायरस नष्ट होण्याचीही शक्यता असते. तथापि, त्यांनी एक इशाराही दिला. त्यानुसार, आपण कसे राहतो, यावरही व्हायरसचे आयुष्य अवलंबून आहे. यासाठी आपल्याला नेहमी मास्क वापरणे, सातत्याने हात धुणे, गर्दीच्या जागा टाळणे आदी कोरोनाप्रतिबंधक उपायांचा अवलंब करावा लागेल.

उकल : आर नंबरचा दर अशा प्रकारे बदलला

दोन महिन्यांपूर्वी १० कोरोना रुग्ण त्यांच्यापासून २५ जणांना संक्रमित करत होते. ते २५ नवे रुग्ण ६३ जणांना आणि ते ६३ बाधित पुढे १५८ जणांना लागण होण्यास कारणीभूत ठरत होते. आता १० जण १.५ री-प्रॉडक्टिव्हिटीच्या दराने १५ जणांना कोरोनाची बाधा करत आहेत. हे १५ जण सुमारे २३ जणांना आणि ते २३ जण पुढे ३५ जणांपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग पोहोचवत आहेत.

राजस्थान : ८०० रुपयांत आरटी-पीसीआर टेस्ट

राजस्थान सरकार लवकरच कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी फक्त ८०० रुपयांत करण्याची व्यवस्था करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी केली. आरटी-पीसीआर टेस्ट कोरोनावरील सर्वात विश्वासार्ह चाचणी समजली जाते. देशात या चाचणीसाठी २५०० रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाते. त्यावर सुप्रीम कोर्टानेही नाराजी व्यक्त केली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser