आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

140 रुपयांसाठी केला खून:पुतण्या बॉबी देओलने चुलत्यावर चाकुने केले 20 वार, पॉकेटमधून घेतले होते पैसे

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाच्या लालसेपोटी जगात खूप भयानक गोष्टी घडल्याचं आपण वाचत, ऐकत आलोय. अशीच एक घटना बिहारच्या भोजपूरमध्ये घडली आहे. फक्त 140 रुपयांसाठी पुतण्या बॉबी देओलने आपल्या चुलत्याचा खून केला. बॉबी देओलने न विचारता काकांच्या खिशातून 140 रुपये काढले होते. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि पुतण्याने घरातून चाकू आणून रागाच्या भरात काकांवर चाकूने हल्ला केला. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रौजा परिसरात ही घटना घडली आहे. हे प्रकरण शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रौजा परिसरातील आहे. अवघ्या 140 रुपयांसाठी बॉबी देओलने आपला चुलता रमेश कुमार उर्फ ​​मल्लू यांची चाकूने भोसकून हत्या केली. तत्काळ कारवाई करत भोजपूर पोलिसांनी हत्येतील मुख्य आरोपी बॉबीला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री काका-पुतण्यामध्ये अवघ्या 140 रुपयांवरून वाद झाला, त्यानंतर बॉबीने आपल्या काकांची हत्या केली, असे भोजपूरचे पोलिस अधीक्षक संजय कुमार सिंह यांनी सांगितले.

आरोपींनी काकांवर चाकूने 20 वार केले.
आरोपींनी काकांवर चाकूने 20 वार केले.

140 रुपयांसाठी हत्या

आरोपी बॉबी देओल उर्फ ​​रवीने आपला चुलता रमेश कुमार यांच्या खिशात असलेल्या 160 रुपयांपैकी 140 रुपये काढून घेतले आणि उर्वरित 20 रुपये खिशात ठेवले. हे रमेश कुमार यांना समजल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर भाचा बॉबी देओलने रमेश यांन चाकूने भोसकून जखमी केले.

एसपी संजय कुमार यांच्या सूचनेवरून विशेष पथक तयार करण्यात आले
एसपी संजय कुमार यांच्या सूचनेवरून विशेष पथक तयार करण्यात आले

बॉबी देओल भोगतोय शिक्षा

या हत्येतील आरोपीला अटक करण्यासाठी एसपी संजय कुमार यांच्या सूचनेवरून सहायक पोलिस अधीक्षक हिमांशू यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथक तयार केल्यानंतर सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रौजा मोहल्ला येथील आरोपींच्या घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान पथकाने या प्रकरणातील आरोपीला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव बॉबी देओल उर्फ ​​रवी कुमार आहे. संतोष प्रसाद असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. नगर पोलिस स्टेशन हद्दीतील रौजा मोहल्ला येथे तो वास्तव्याला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा गुन्हेगारी इतिहास पोलिस तपासत आहेत. तर अटक करण्यात आलेला आरोपी बॉबी देवल उर्फ ​​रवीचा भाऊ सनी देओल देखील हत्येप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

बातम्या आणखी आहेत...