आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री अम्मा अर्थात स्व. जयललिता यांचा खरा वारसदार असल्याचा पुरावा देण्यासाठी त्यांच्या सत्ताधारी एआयएडीएमके अंतर्गत लढाई सुरू झाली आहे. जयललिता यांच्या निकटवर्तीय व माजी पक्षप्रमुख शशिकला चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. आता एका महिन्यानंतर एप्रिलमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक हाेऊ घातली आहे. निवडणूकपूर्व पाहणीत द्रमुक आघाडीवर असल्याचे दाखवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत शशिकला आल्यानंतर राज्यात आणि त्यांच्या पक्षात राजकीय घडामाेडींना वेग आला आहे. काेराेनाबाधित शशिकला २४ जानेवारीला तुरुंगातून सुटल्यानंतर रुग्णालयात राहिल्या. एक फेब्रुवारीला शशिकला रुग्णालयातून टाेयोटा प्राडाे नावाच्या लक्झरी एसयूव्ही गाडीतून बाहेर पडल्या. त्यांच्या गाडीवर एआयएडीएमके पक्षाचा ध्वजही हाेती. वास्तविक त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.
जयललितादेखील याच ब्रँडची गाडी वापरत असत. वास्तविक ही गाडी नव्हे, तर पक्षातील दाेन गटांना ईपीएस व आेपीएससाठी संदेश हाेता. म्हणजेच अम्मा यांच्या राजकीय वारसदार आपणच आहाेत, असे शशिकला यांचा उद्देश हाेता. शशिकला स्वत:ला चिन्ना अम्मा (ज्युनियर अम्मा) दर्शवण्याच्या प्रयत्नात आहेत. मुख्यमंत्री पलानीसामी यांनी शशिकला यांचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी शशिकला यांना १४ फेब्रुवारी २०१७ रोजी अटक झाली होती. पलानीसामी यांनी पक्षाला बळकट केले. उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांचा दुसरा गट तयार झाला. शशिकला पक्षात याव्या, असे पक्षातील मोठ्या गटाला वाटते. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षांत मोठी नाराजी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जयललिता यांच्या कार्यकाळात शशिकला व त्यांचा गट पक्षात सर्वात बलाढ्य होता.
सामावून घेण्याची भाजपची इच्छा
शशिकला यांना एआयएडीएमके पक्षाच्या दोन्ही गटांनी पक्षात प्रवेश द्यावा. त्यासाठी आधी इपीएस व आेपीएस गटाने आपसातील संघर्ष मिटवला पाहिजे. तसे झाले नाहीतर पक्षात आणखी नवा गट तयार होईल, अशी भीती भाजपला वाटते. निवडणूकपूर्व चाचणीत रालोआ व द्रमुक आघाडीवर दाखवू लागले आहेत.
जुन्या चिन्हासाठी सुप्रीम कोर्टात धाव
शशिकला एआयएडीएमके पक्षाचे दाेन पानांचे जुने चिन्ह मिळवू इच्छितात. त्यासाठी त्या प्रयत्न करू लागल्या आहेत. लवकरच सर्वाेच्च न्यायालयात आयाेगाच्या निर्णयाविराेधात फेरयाचिका दाखल केल्या आहेत. २३ नाेव्हेंबर २०१७ राेजी निवडणूक आयाेगाने पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या गटाला या चिन्हाचे वाटप केले हाेते. शशिकला यांचे नातेवाईक टीटीव्ही िदनाकरण यांनी दिल्ली उच्च न्यायालयात त्यास आव्हान दिले हाेते. त्यानंतर सर्वाेच्च न्यायालयाने मार्च २०१९ व जुलै २०२० मध्ये या संबंधी दाेन याचिकांना फेटाळल्या हाेत्या. परंतु याबाबत आता अखेरचा पर्याय म्हणून फेरविचार याचिकेकडे पाहिले जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.