आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Fight With Corona Virus | Now A Household Survey In 45 Municipalities, In This Area 78% Of Patients In The Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी लढा:आता 45 पालिकांत घरोघरी सर्व्हे, या क्षेत्रात देशातील 78% रुग्ण, गंभीर आजारी असणाऱ्या लोकांचा डेटा मिळवणार

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • केंद्राचे महाराष्ट्र-गुजरातसह 10 राज्यांसाठी वेगळे धोरण

कोरोनाचा कहर सहन करत असलेल्या महाराष्ट्र, गुजरातसह १० राज्यांतील ४५ पालिका क्षेत्रांतील संसर्ग थांबवण्यासाठी घराघरांत सर्वेक्षण केले होईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले की तपासणी व्यवस्था आणखी सक्षम हवी. आरोग्य सचिव प्रीती सूदन यांनी व्हिसीद्वारे बैठक घेतली. त्यात ४५ पालिका क्षेत्रांशी संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक व मेडिकल कॉलेजचे प्रमुख सहभागी होते. बैठकीत ४५ नगरपालिकांच्या दाट लोकवस्तीतील संसर्ग थांबवणे आणि घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्यावर चर्चा झाली.

१० राज्यांतील ३८ जिल्ह्यांत आहेत 

या ४५ पालिका महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगण, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमधील ३८ जिल्ह्यांतील ४५ नगरपालिकांचा सर्व्हे करण्यात येईल. मात्र प. बंगालमध्ये तूर्त सर्व्हेबाबत चर्चा झाली नाही.

गंभीर आजारी असणाऱ्या लोकांचा डेटा मिळवणार

मृत्यूचा दर घटवण्यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेले लोक शोधणे, वृद्ध व्यक्ती आणि गंभीर आजार असलेल्या लोकांचा शोध घेणे यासाठी ही योजना बनवली आहे.

बातम्या आणखी आहेत...