आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:काश्मिरात अंतिम मतदार याद्या 31 ऑगस्टपर्यंत

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये फेररचनेनंतर निवडणूक आयोगाने मतदार यादीत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आयोग ३१ ऑगस्टपर्यंत मतदार यादी तयार करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार व निवडणूक आयुक्त अनुप पांडे यांनी बुधवारी त्याचा आढावा घेतला. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विधानसभा मतदारसंघनिहाय नकाशा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पहिल्या मतदार यादीत दुरुस्ती गरजेची आहे. कारण विधानसभा मतदारसंघ फेररचनेनंतर अनेक बदल झाले आहेत. त्यासाठी मतदान केंद्रांचा आढावा, नाव बदलल्यानंतर त्याची रचना इत्यादी कामे ३० जूनपर्यंत केली जाणार आहेत. नवीन मतदान केंद्र होणार असलेली गावे निश्चित केली जातील. फेररचनेमुळे काही मतदान केंद्रांचा समावेश नव्या मतदारसंघात होणार आहे. काही गावे पूर्णपणे किंवा काही भाग दुसऱ्या मतदारसंघात समाविष्ट करावे लागतील. बूथस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण ५ जुलैपर्यंत केले जाणार आहे. २५ जुलैपर्यंत मतदान केंद्रांचे काम पूर्ण होईल. मतदार यादी ३१ ऑगस्टपर्यंत तयार केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...