आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Finance Minister Nirmala Sitharaman Announces Rs 20,000 Crore Release To States In Overnight

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीएसटी:राज्यांना रातोरात 20 हजार कोटींचा निधी जारी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • जून 2022 नंतरही भरपाई उपकर कायम ठेवण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय

जीएसटी भरपाई उपकरातून प्राप्त झालेले २०,००० कोटी रुपयांचे राज्यांमध्ये वाटप केले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. ही रक्कम राज्यांनी सोमवारी रात्रीच मिळेल, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान जीएसटी परिषदेने जून २०२२ नंतरही भरपाई उपकर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेची आगामी बैठक १२ ऑक्टोबरला होणार असून राज्यांच्या भरपाईच्या मुद्द्यावर चर्चा केली जाईल. दुसरीकडे, बैठकीनंतर सीतारमण म्हणाल्या, राज्यांच्या भरपाईच्या मुद्द्यावर एकमत झाले नाही. २१ राज्यांनी केंद्राने सुचवलेल्या पर्यायांची निवड केली. राज्यांना भरपाईची रक्कम नाकारत नसल्याचेही सीतारमण यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...