आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणात फिंगरप्रिंट सर्जरी टोळीचा भांडाफोड:आखाती देशांनी हकालपट्टी केलेल्या दोषींच्या बोटांचे ठसे बदलत होते

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणची राजधानी हैदराबादेत फिंगरप्रिंट सर्जटी टोळीचा भांडाफोड झाला आहे. ही टोळी आखाती देशांनी हकालपट्टी केलेल्या दोषींच्या बोटांचे ठसे बदलण्याची कुरापत करत होती. असे केल्याने या दोषींना पुन्हा आखाती देशांत जाऊन नोकरी धंदा करण्याचा मार्ग मोकळा होत होता. पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी केरळ व राजस्थानातही फिंगरप्रिंट पॅटर्न बदलण्यासाठी अशा 11 शस्त्रक्रिया केल्या आहेत. ते एका सर्जरीसाठी 25 हजार रुपयांचे शुल्क घेत होते. या प्रकरणी पुन्हा कुवैतला जाण्यासाठी सर्जरी करणाऱ्या 2 कन्स्ट्रक्शन वर्कर्सनाही अटक करण्यात आली आहे.

आरोपी रुग्णालयात टेक्निशिअनचे काम करतात

पोलिसांनी आरोपींकडून सर्जरीसाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय किट व अन्य पुरावे जप्त केलेत.
पोलिसांनी आरोपींकडून सर्जरीसाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय किट व अन्य पुरावे जप्त केलेत.

हैदराबादाच्या मलकानगिरी झोनमध्ये 29 ऑगस्ट रोजी एका विशेष पथकाने मोहीम राबवून 4 जणांना अटक केली. हे आरोपी हैदराबादच्या एका हॉटेलात थांबले होते. ते घाटकेसर भागात आणखी काही लोकांची शस्त्रक्रिया करण्याच्या तयारीत होत अशी माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी 36 वर्षीय गजलकोंडुगरी नागा मुनेश्वर रेड्डी हा कडप्पा जिल्ह्यातील कृष्णा डायग्नोस्टिकमध्ये रेडिओलॉजिस्ट व एक्स रे टेक्निशिअन म्हणून कार्यरत आहे. तर 39 वर्षीय दुसरा आरोपी कंस्ट्रक्शन वर्कर म्हणून काम करतो.

बोटांचा वरील थर कापून पॅटर्न बदलत होते

आरोपी गजलकोंडुगरी व सागबाला सर्जरी करताना बोटांच्या वरील थर कापून टाकत होते. त्यानंतर टिशूचा भाग काढून बोटे शिवून टाकत होते. ही जखम एक किंवा दोन महिन्यात भरून येत होती. त्यानंतर वर्षभरात फिंगरप्रिंट पॅटर्नमध्ये थोडासा बदल होत होता.

सर्जरी झालेले लोक आधारमध्ये फिंगरप्रिंट अपडेट करत होते

सर्जरी झालेले लोक आधार कार्डात आपल्या बोटांचे ठसे अपडेट करत होते. त्यानंतर नव्या पत्यासह कुवैतचा नवा व्हिसा प्राप्त करण्यासाठी अर्ज करत होते. सायबराबाद पोलिसांनी यापूर्वीही अशा एका टोळीचा भांडाफोड केला होता. ही टोळी पैसे उकळण्यासाठी पॉलिमरचा वापर करुन बोटांच्या ठशांची क्लोनिंग करत होती.

बातम्या आणखी आहेत...