आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fir Against Barber । Cuts Shikha Of A Pandit । Dehradun Uttarakhand । Bhavesh Salon Dehradun

पंडितजीची शेंडी कापली, न्हाव्याविरोधात FIR:केस कापत असताना न्हाव्याकडून पंडितजीची शेंडी झाली कट, अंघोळ करताना पंडितजींना कळाले तर दाखल केला गुन्हा

डेहराडून4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नैनीतालमध्येही समोर आले होते असे प्रकरण

उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये केस कापण्यासाठी गेलेल्या पंडितजींची शेंडीच कट झाली. याचा राग येऊन त्यांनी थेट पोलिस स्टेशनमध्ये न्हाव्याच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

डेहराडूनच्या नवादा भागात राहणारे पंडित शिवानंद कोटनाला रविवारी भावेश सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेले होते. येथे त्यांनी आपल्या केसांना कलरही केले आणि घरी परतले. सुमारे एक तासानंतर जेव्हा ते आंघोळ करायला गेले, तेव्हा त्यांना कळाले की, आपली शेंडी कापली गेली आहे.

वादानंतर FIR दाखल
पंडित शिवानंद कोटनाला यांना त्यांची शेंडी कापल्याचे कळताच ते परत भावेश सलूनला पोहोचले. येथे सलून संचालक आणि पंडितजी यांच्यात वाद सुरू झाला. जेव्हा वाद वाढला तेव्हा संचालकाने शिवानंद यांची माफी मागितली, पण त्यांनी त्याला माफ करण्यास नकार दिला. दोघांमधील वाद बराच काळ चालू होता. यानंतर शिवानंद यांनी नेहरू कॉलनी पोलिस ठाणे गाठले आणि सलून चालकाविरोधात तक्रार दाखल केली.

कलर सुकल्यानंतर कळाले
नेहरू कॉलनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पंडित शिवानंद कोटनाला केस कापल्यानंतर घरी पोहोचले. त्यांनी 1 तास डोक्यावर रंग सुकवला. यानंतर, जेव्हा त्यांनी आंघोळ करताना डोक्यावर हात फिरवला तेव्हा त्यांना शेंडी गायब असल्याचे आढळले. यानंतर, त्यांनी थेट सलून गाठले आणि नंतर तक्रार घेऊन पोलिस स्टेशन गाठले.

पोलिसांनी अनेक कलमे लावली
नेहरू कॉलनीचे एसएचओ राकेश गुसई यांनी भास्करला सांगितले की, पंडित शिवानंद कोटनाला यांनी सलून संचालक भावेशविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यासह, जीवे मारण्याची धमकी देणे, मारहाण करणे आणि शिवीगाळ करण्याच्या कलमा देखील जोडल्या आहेत. पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

नैनीतालमध्येही समोर आले होते असे प्रकरण
याआधी 24 नोव्हेंबर 2020 रोजी असाच एक प्रसंग उत्तराखंडच्या नैनीतालमध्येही समोर आला होता. येथे 21 वर्षीय बार्बर इफ्तेकरला 56 वर्षीय विश्व हिंदू परिषदेचे नेते विशंबर दत्त पलडिया यांची शेंडी कापल्याबद्दल तुरुंगात पाठवण्यात आले होते. पोलिसांनी आरोपीविरुद्ध धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...