आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागाझियाबाद पोलिसांनी ट्विटर इंडिया आणि 2 काँग्रेस नेत्यासह 9 जणांविरोधात FIR दाखल केली आहे. FIR मध्ये घटनेला जातीय रंग दिल्याचा आरोप आहे. तसेच, ट्विटरवर आरोप आहे की, पोलिसांकडून प्रकरण स्पष्ट केल्यानंतरही ट्विटरने चुकीचे ट्विट हटवण्यास कोणतीही पाऊले उचलली नाहीत. पोलिसांनी या प्रकरणात मोहम्मद जुबैर, राना अय्यूब, द वायर, सलमान निजामी, मसकूर उस्मानी, समा मोहम्मद, सबा नकवी, ट्विटर कम्यूनिकेशन इंडिया प्रायवेट लिमिटेड आणि ट्विटर INC विरोधात FIR दाखल केली आहे.
नियमांचे पालन न करणे ट्टविटरला पडले महागात
नवीन आयटी नियमांचे पालन न करणे ट्विटरला चांगेलच महागात पडले आहे. वृत्त संस्थेने सांगितल्यानुसार, भारतात आता ट्विटरने कायदेशीर संरक्षणाचा अधिकार गमावला आहे. सरकारकडून 25 मे पासून लागू नवीन आयटी नियमांना ट्विटरने अद्याप लागू केले नाही. यामुळेच ट्विटरवर ही कारवाई झाली आहे. म्हणजेच, ट्विटरवर आता आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकणार.
आतापर्यंत काय सुरक्षा होती ?
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कलम 79 अंतर्गत सुरक्षा पुरवली जायची. ही सुरक्षा ट्विटरलाही मिळत होती. यात कोणत्याही गुन्ह्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केल्यावर, जबाबदारी कंपनीची नव्हती. नवीन आयटी नियमांतर्गत सरकारने म्हटले की, सोशल मीडिया कंपनीने एका महीन्याच्या आत मुख्य अनुपालन अधिकारी (CCO) ची नियुक्ती करावी, जो यूजर्सच्या तक्रारी सोडवेल. नियुक्ती न केल्यास सरकारने कलम 79 अंतर्गत सुरक्षा रद्द करण्याचा इशारा दिला होता. यानंतर आता 15 जून रोजी ट्विटरविरोधात पहिली FIR दाखल झाली.
समाजात अशांती पसरवण्याचा उद्देश होता
FIR मध्ये म्हटले की, वरील सर्व लोकांनी ट्विटरवर सत्य जाणून घेतल्याशिवाय घटनेला जातीय रंग दिला. त्यांनी समाजात अशांती पसरवणे आणि जातीय दंगे भडकवण्यासाठी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करण्यात आला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, घटना वयक्तिक वादातून झाली. यात हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोक सामील होते. पण, आरोपींनी घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला.
काय आहे प्रकरण ?
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात काही लोक एका मुस्लिम वृद्धाला मारहाण करताना दिसत आहेत. त्या वृद्धाने जय श्री राम न म्हटल्यामुळे मारहाण करत दाढी कापल्याचा आरोप केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.