आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • FIR Filed Against Congress President Sonia Gandhi In Karnataka Shivamogga Over Congress Party Tweet On PM CARES Fund

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीएम-केअर फंड प्रकरण:सोनिया गांधींविरोधात कर्नाटकातील शिवमोगामध्ये एफआयआर दाखल, जनतेला सरकारविरोधात भडकवण्याचा आरोप

शिवमोगाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन 11 मे रोजी पीएम-केअर फंडवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पीएम-केअर फंडबाबत केलेल्या ट्वीटमुळे ही तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन 11 मे रोजी ट्वीट करुन पीएम-के्र फंडवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. एफआयआरमध्ये सोनिया यांना ट्विटर अकाउंट हँडलर सांगत जबाबदार ठरवण्यात आले आहे. तक्रारदार वकील प्रवीण केवीचा दावा आहे की, सोनिया यांनी भारत सरकारविरोधात वक्तव्य केले आणि जनतेला सरकारविरोधात भडकावले.

काँग्रेसच्या ट्वीटमध्ये काय होते?

ट्वीटमध्ये पीएम-केअर फंडबाबत म्हटले होते की, याच्या नावावरुनच समजते की, हा फंड जनतेसाठी नाही, तर पंतप्रधानांसाठी आहे. भाजपला जनतेची परवा असती, तर प्रवासी मजुर रोज पायी चालत नसते.

तक्रारदाराचा दावा आहे की, पीएम-केअर फंडला पीएम-केअर फ्रॉड म्हटले होते. असे म्हणून काँग्रेसने कोरोना संकटात जनतेमध्ये अफवा पसरवली. त्याने काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन मिळवलेल्या माहितीच्या आधारे सोनिया गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...