आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायरस मिस्त्री अपघाताप्रकरणी FIR दाखल:कार चालवणाऱ्या महिला डॉक्टर अनायतांवर सदोष मनुष्यवधाचा ठपका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी पालघर पोलिसांनी FIR दाखल केला आहे. त्यात अपघातावेळी कार चालवणाऱ्या अनायता पंडोले यांच्याविरोधात भादंवि कलम 304(a) म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनायता यांचे पती दरियस पंडोले यांचा जबाब नोंदवल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, 4 सप्टेंबर रोजी कासा भागात झालेल्या अपघाताप्रकरणी काही पुरावे उजेडात आलेत. त्या पुराव्यांनुसार कार चालक डॉक्टर अनायता पंडोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे.

अरुंद रस्त्यामुळे झाला अपघात

आतापर्यंतच्या तपासात मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारला अहमदाबाद-मुंबई महामार्गावर लेन बदलण्यासाठी जागा न मिळाल्यामुळे अपघात झाल्याचे निष्पन्न झाले होते. मिस्त्रींची कार महामार्गावरील सूर्या नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकली होती. अपघातावेळी कार चालवणाऱ्या डॉक्टर अनायता पंडोले यांचे पती दरियस पंडोले यांनी आपल्या जबाबात ही आपबिती पोलिसांना सांगितली होती.

पंडोलेंचा जबाब

पंडोलेंनी पोलिसांना सांगितले की, त्यांची पत्नी कार हायवेच्या थर्ड लेनमध्ये चालवत होती. पुलाजवळ रस्ता अरुंद झाला. थर्ड लेन दुसऱ्या लेनमध्ये मर्ज झाली. पूल येण्यापूर्वी सायरस याच्या कारपुढील वाहनाने आपली लेन बदलली. मर्सिडिज चालवणाऱ्या अनायता यांनीही दुसऱ्या लेनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण तिथे एक ट्रक जात होता. त्याुळे त्यांना तसे करता आले नाही.

मर्सिडिज बेन्झच्या अपघातानंतर सायरस मिस्त्री (लाल वर्तुळात) व कार चालवणाऱ्या डॉक्टर अनायता पंडोले घटनास्थळी असे पडले होते.
मर्सिडिज बेन्झच्या अपघातानंतर सायरस मिस्त्री (लाल वर्तुळात) व कार चालवणाऱ्या डॉक्टर अनायता पंडोले घटनास्थळी असे पडले होते.

4 सप्टेंबर रोजी अपघातात ठार झाले होते सायरस

2 महिन्यांपूर्वी म्हणजे 4 सप्टेंबर रोजी टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. ते गुजरातच्या उदवाडा स्थित एका पारशी मंदिरातून मुंबईला परत येत होते. 54 वर्षीय मिस्त्रींची कार पालघर जिल्ह्यात एका दुभाजकाला धडकली. त्यात मिस्त्रींसह त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला. तर कार चालवणाऱ्या अनायता व त्यांचे पती दरियस पंडोले जखमी झाले. दरियस जेएम फायनांशिअलचे सीईओ आहेत.

उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाताशी संबंधित आणखी काही बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे निधन:मर्सिडीज दुभाजकाला धडकली, मुंबईची महिला डॉक्टर चालवत होती कार

सायरस यांच्या कारचा फॉरेन्सिक रिपोर्ट:पुलाच्या चुकीच्या डिझाइनमुळे अपघात, सेफ्टी फीचर्स कार्यान्वित होते; सीटबेल्ट नसल्याने जीव गेला

बातम्या आणखी आहेत...