आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीच्या मुंडवा मेट्रो स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी चार मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली. आगीच्या तडाख्यात सापडून २७ लोकांचा मृत्यू झाला. गंभीर भाजलेल्या १२ जणांना रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी ५० हून अधिक नागरिकांना वाचवले.
या इमारतीत अनेक कंपन्यांची गोदामे आहेत. येथे सीसीटीव्ही कॅमेरे, राउटर, वायफाय आदींची निर्मिती-जोडणीची कामे केली जातात. इमारतीत जाण्या-येण्यासाठी एकच दरवाजा आहे. आग दरवाजाजवळच लागली. त्यामुळे अडकलेल्या लोकांना बाहेर पडता आले नाही. काहींनी खिडक्यांतून उड्या मारल्या. घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती...
पहिल्या मजल्यावरील सीसीटीव्ही कॅमेरा व राउटर तयार करणाऱ्या कंपनीतून आग सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत अनेक बेपत्ता होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. पहिल्या मजल्यांवर २७ मृतदेह आढळले. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर १० ते १५ जण अडकले असल्याची भीती व्यक्त आहे.
या भयंकर आगीच्या कारणाचा शोध सुरू
बचाव कार्यादरम्यान अडकलेल्या लोकांना दोर आणि क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. इमारतीमधील धूर बाहेर काढण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी खिडक्यांच्या काचाही फोडल्या. मृतांमध्ये किती महिला आणि किती पुरुष आहेत हे स्पष्ट झाले नव्हते. इमारतीत आग कशाने लागली याचा तपास सुरू आहे.
इमारतीत जाण्या-येण्यासाठी होता एकच दरवाजा
इमारतीत जाण्या-येण्यासाठी एकच दरवाजा होता. आग नेमकी दरवाजाजवळ लागल्याने सारेच अडकले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.