आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबलपूर:रुग्णालयाच्या गेटवर आग; 8 जणांचा हाेरपळून मृत्यू

जबलपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात आग लागल्याने ८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी ५ रुग्ण आणि ३ रुग्णालयातील कर्मचारी होते. ५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची स्थिती गंभीर आहे. दुपारी २.४५ वाजता तीन मजली रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग इतकी भीषण होती की, लोक बाहेर पडू शकले नाहीत. जबलपूरचे जिल्हाधीकारी इलैयाराजा टी. यांनी सांगितले की, दुर्घटनेवेळी रुग्णालयात २०-२५ लोक होते. सर्व लोकांना रुग्णालयातून बाहेर काढले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाखाचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...